जळगाव

Daya Pawar Memorial Award : पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर; डॉ देवी, मेवाणी आणि चित्रकार बाविस्कर मानकरी

सकाळ वृत्तसेवा

Daya Pawar Memorial Award : साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून, यंदाच्या पुरस्कारांसाठी ज्येष्ठ साहित्यिक आणि भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी आणि सामाजिक कार्यकर्ते व गुजरातचे प्रभावी नेते, मानवी हक्क कार्यकर्ता आणि आमदार जिग्नेश मेवाणी यांची निवड झाली आहे. (Padma Shri Daya Pawar Memorial Award announced jalgaon news)

सोबतच ‘काळ्या निळ्या रेषा’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकासाठी चित्रकार राजू बाविस्कर यांना यंदाचा ग्रंथाली पुरस्कृत ‘बलुतं’ पुरस्कार जाहीर झाला आहे. दया पवार स्मृती पुरस्काराचे यंदाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे, हे विशेष.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या सहकार्याने २७ ऑक्टोबरला सायंकाळी सहाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या ‘रंगस्वर’ सभागृहात ज्येष्ठ संपादक आणि खासदार कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली वितरण सोहळा होईल.

सोहळ्यादरम्यान कवी-अभिनेता अक्षय शिंपी यांचे कथाकथन आणि ‘झुंड’फेम विपीन तातड आणि माही जी. या रॅप क्षेत्रात सध्या धुमाकूळ घालणाऱ्या कलाकारांचा रॅप सादर होणार आहे.

पत्रकार अलका धुपकर सूत्रसंचालन करतील. यंदाचा हा पंचविसावा पुरस्कार सोहळा असून, प्रत्येकी दहा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, दया पवारांच्या चाहत्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन दया पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा दया पवार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी येवला तालुक्यात उपोषणाला सुरुवात

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT