Dasara Melava before party in nashik esakal
जळगाव

Dasara Melava : दसरा मेळाव्यापूर्वी नाशिकमध्ये मधुशाला

सकाळ वृत्तसेवा



जळगाव : जळगाव शहरासह जिल्ह्यातून आलेल्या हजारावर कार्यकर्त्यांची नाशिक रोडवरील मित्रा या शासकीय प्रशिक्षण संस्थेत तात्पुरत्या निवासाची (विसाव्याची) व्यवस्था करण्यात आली होती. मुंबईच्या मेळाव्याला निघताना कार्यकर्त्यांनी रात्रभर या ठिकाणी दारूच्या बाटल्या रिचविल्या.

बुधवारी (ता. ५) सकाळी या संस्थेच्या आवारात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला सापडला. यानिमित्ताने कार्यकर्त्यांची नाशिकमध्ये ओली पार्टी केल्याचे सचित्र फोटो व्हायरल झाल्यावर एकच चर्चा रंगली होती.

जळगाव जिल्ह्यातील ८२ क्रूझर, खासगी बसने कार्यकर्ते मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास मित्रा संस्थेच्या विश्रामगृहात पोचले. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना या संस्थेत प्रशिक्षण देण्यात येते. वातानुकूलित विश्रामगृहात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली. शेवभाजीसह चार भाज्या, गुलाबजाम असा जेवणाचा बेत होता; परंतु विश्रामगृहात रात्री कार्यकर्त्यांची मधुशालाच रंगली.

वाइन शॉपशेजारीच मुक्काम
मुक्कामाच्या ठिकाणी शेजारीच वाइन शॉप होते. त्यामुळे कार्यकर्ते दिवस उजाडेपर्यंत या ठिकाणी दारू रिचवत असल्याने सकाळी विश्रामगृह आवारात रिकाम्या दारूच्या व पाण्याच्या बाटल्यांचा खच पडलेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

'ठरलं तर मग'च्या सुमन काकूंना खऱ्या आयुष्यात आहे 'हा' गंभीर आजार; म्हणाल्या- दिग्दर्शकाने हाक मारली तरी...

Latest Marathi News Live Update : इस्रायलमध्ये संशयित इराणी 'क्लस्टर बॉम्ब' हल्ल्यात बालवाडीचे नुकसान

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT