Dr. Ulhas Patil MEdical College, Jalgaon esakal
जळगाव

Jalgaon News : Osteogenesis Imperfectaच्या रुग्णावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जन्मत: हाडे कमकुवत असणे, थोड्याही धक्क्याने हाडांचे फ्रॅक्‍चर होणे हा ‘ऑस्टीओजेनिसिस इम्परफेक्टा’ हा आजार असलेल्या जळगावातील मुलावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात तज्ज्ञ पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जनद्वारे यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली. (patient of Osteogenesis Imperfecta Successful treatment at dr Ulhas Patil Hospital Jalgaon News)

जळगावातील १७ वर्षीय किरण (नाव बदललेले) याचा दुचाकीवरून अपघात झाला आणि यात त्याला फ्रॅक्‍चर झाले. अस्थिरोग तज्ज्ञांनी त्याला तपासले असता किरणला ‘ऑस्टीओजेनेसिस इम्परफेक्टा’ हा आजार असल्याचे निदान झाले. ‘ऑस्टीओजेनेसिस इम्परफेक्टा’ हा आजार परदेशातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होतो. भारतात या आजाराचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे त्यातील तज्ज्ञ बोटावर मोजण्याइतकेच आहेत.

मात्र, डॉ. उल्हास पाटील यांनी मुंबई-पुण्याच्या धर्तीवर ‘गोदावरी’तच गरजू रुग्णांसाठी सर्वच स्पेशालिटी येथे उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा लाभ किरणला झाला. त्यातून या रुग्णावर दोन दिवसांत दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

त्याच्या दोन्ही पायांना असलेला बाक टायटॅनियम इम्प्लांट वापरून कृत्रिमरित्या सरळ करण्यात आला. तज्ज्ञ सर्जन, निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्यासह नर्सिंग स्टाफ, शस्त्रक्रियेपूर्वी भूलरोग तज्ज्ञांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

दुर्मिळ आजार, प्रभावी उपचार

'ऑस्टीओजेनेसिस इम्परफेक्टा’ या आजाराचे रुग्ण भारतात कमी आहेत. एका लाखात १०० रुग्णांना हा आजार असतो.

‘ऑस्टीओजेनेसिस इम्परफेक्टा’ अर्थात, ‘ऑस्टीओ’ म्हणजे हाड, ‘जेनिसस’ म्हणजे हाडांची वाढ व ‘इम्परफेक्टा’ म्हणजे परफेक्ट नसणे, असा त्याचा अर्थ आहे. ही शस्त्रक्रियाही खूप जिकरीची व गुंतागुंतीची होती. मात्र, आमच्या टीमने ती यशस्वी केली, अशी प्रतिक्रिया शस्त्रक्रिया करणाऱ्या तज्ज्ञांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT