blackmailing esakal
जळगाव

Jalgaon News : बायकोच्या मैत्रिणीलाच लग्नासाठी Blackmailing

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : बायकोला घटस्फोट देऊन तिच्याच विवाहित मैत्रिणीला वारंवार मोबाईलवर फोन करून ब्लॅकमेलिंग करून लग्न करण्याची मागणी करत धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र सुभाष पाटील, असे संशयिताचे नाव आहे. (person divorce his wife and blackmail his wife girlfriend for marriage jalgaon crime news)

जळगाव शहरातील एका भागात २१ वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. या विवाहितेसोबत कामाच्या ठिकाणी ओळख असलेल्या एका मैत्रिणीने पती जितेंद्र पाटील यांच्याशी घटस्फोट घेतलेला आहे, असे विवाहित महिलेला माहीत नव्हते.

त्यामुळे जितेंद्र पाटील याने विवाहित महिलेशी ओळख निर्माण करून मोबाईल नंबर घेतला. पत्नीशी बोलायचे आहे, असे सांगून वारंवार फोन करत होता. त्यानंतर मैत्रिणीचा आणि जितेंद्र पाटील यांचा घटस्फोट झाल्याचे विवाहित महिलेला समजले. त्यानंतर महिलेने मला कॉल करू नको, असे जितेंद्र पाटील याला समजावून सांगितले.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

तरीसुद्धा जितेंद्र पाटील हा वारंवार या विवाहितेला फोनवर बोलण्यासाठी धमकी देत होता. त्यानंतर माझ्याशी लग्न कर, असे म्हणत त्रास देऊ लागला. लग्न केले नाही तर मी तुझा संसार मोडून टाकेल.

तुझ्याबद्दल तुझ्या पतीला बरे-वाईट सांगून गैरसमज पसरवून टाकेल, अशी धमकी देऊन ब्लॅकमेलिंग करत होता. घडल्या प्रकाराबाबत पीडित विवाहितेने शनिवारी (ता. २८) जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठत जितेंद्र पाटील यांच्याविरोधात तक्रार दिल्यावरून जितेंद्र पाटील यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT