crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : उधारीचे पैसे मागितल्याने गृहस्थाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून दोघांनी एका तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण करून दुखापत केल्याची घटना रामेश्वर कॉलनीतील आदित्य हॉटेल चौकात रात्री आठच्या सुमारास घडली. (person was beaten up for asking for borrowed money jalgaon crime news)

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर कॉलनीतील रहिवासी सागर सुरेश कोळी (वय ३२) हा मिस्तरी काम करून आपला उदरनिर्वाह करतो.

त्याने संशयित योगेश ऊर्फ कर्कटक भागवत जाधव (रा. रामेश्वर कॉलनी) याला उधार दिलेले पैसे मागितले असता, योगेशला राग आल्याने त्याने सागर कोळी याला त्याचा मित्र योगेश (पूर्ण नाव, गाव पत्ता माहीत नाही) अशा दोघांनी २९ नोव्हेंबरला रात्री आठच्या सुमारास लाकडी दांड्याने डाव्या हातावर व पायावर मारून दुखापत केल्याचा प्रकार घडला.

याबाबत सागर कोळी याने दिलेल्या फिर्यादीवरून दोन आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दयानंद सरवदे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT