A conceptual picture of a 'pink toilet' for women proposed to be built in the city. 
जळगाव

Pink Toilet: जळगावमध्ये प्रमुख रस्त्यांवर साकारणार ‘पिंक टॉयलेट’; सुबोनियो केमिकल्स-मराठी प्रतिष्ठानचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Pink Toilet: शहरातील मुख्य रस्त्यांवर महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीत. त्यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शहराची गरज पाहता, मराठी प्रतिष्ठान व सुबोनियो केमिकल्सने याबाबत पुढाकार घेतला आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर महिलांसाठी सुसज्ज पाच ‘पिंक टॉयलेट’ स्वखर्चाने बनवून देण्याचा प्रस्ताव शुक्रवारी (ता. १) महापालिका प्रशासनाला देण्यात आला. (Pink Toilet will be implemented on major roads in Jalgaon news)

महानगरपालिका प्रशासनाने ‘पिंक टॉयलेट’ साठी योग्य जागा, पाणी व विजेची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप' प्रकल्पांतर्गत महापालिका प्रशासन, सुबोनियो केमिकल्स आणि मराठी प्रतिष्ठानतर्फे ‘पिंक टॉयलेट' प्रकल्प शहरात राबविला जाईल.

दररोज स्वच्छतेची अपेक्षा

महिलांसाठीच्या ‘पिंक टॉयलेट'च्या दैनंदिन स्वच्छतेसाठी महापालिकेने दररोज स्वच्छता कर्मचारी उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा आहे. ‘पिंक टॉयलेट'ची देखभाल मराठी प्रतिष्ठान आणि सुबोनियो केमिकल्सतर्फे संयुक्तपणे करतील.

जागेच्या आवश्‍यकतेचे मार्ग

महाबळपासून रेल्वे स्थानकापर्यंत ‘पिंक टॉयलेट' बसविण्यासाठी महानगरपालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी, असे पत्र महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांना देण्यात आले.

सुबोनियो केमिकल्स लिमिटेडचे संचालक सुबोध कुमार चौधरी, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जमील देशपांडे यांनी महिलांसाठीच्या ‘पिंक टॉयलेट' प्रकल्पाबाबत महापालिका प्रशासनाला माहिती दिली. ‘पिंक टॉयलेट’ हा अभिनव उपक्रम राज्यातील पहिलाच प्रकल्प असल्याची माहिती श्री. देशपांडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT