gulabrao patil esakal
जळगाव

Jalgaon News : इएसआयसी रुग्णालयांसाठी ‘एमआयडीसी’ दिला भूखंड; 5,425 चौरस मीटर जागेत साकारणार रूग्णालय

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळासाठी (इएसआयसी) रुग्णालयासाठी एमआयडीसी क्षेत्रात अवघ्या १ रूपया चौरस मीटरमध्ये जागा उपलब्ध झाली आहे. यामुळे या रुग्णालयाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही जागा मिळाली आहे.(Plot given to MIDC for ESIC hospitals jalgaon news)

जळगाव शहर व जिल्ह्यातील कामगारांसाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त शासकीय रूग्णालय असावे, अशी जिल्ह्यातील कामगारांची अनेक दिवसांपासून मागणी होती. यासाठी खासदार उन्मेष पाटील यांच्या माध्यमातून कामगारांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी केली होती.

या मागणीची दखल घेत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना रुग्णालयासाठी जागेचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. यासाठी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी प्रसाद व प्रांताधिकारी महेश सुधळकर यांनी पुढाकार घेत सप्टेंबर २०२३ महिन्यात जागेचा शोध घेतला.

यासाठी पाच सदस्यीय समितीने एमआयडीसीतील जागांची पाहणी करून रुग्णालयासाठी भूखंड क्रमांक २१६९४ मध्ये रुग्णालयासाठी ५४२५ चौरस मीटर जागा अंतिम करत एमआयडीसीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला.

या प्रस्तावाचा शासनपातळीवर उद्योग मंत्रालयाकडे पालकमंत्री पाटील, ग्रामविकास मंत्री महाजन यांनी पाठपुरावा केला. एमआयडीसीने रुग्णालयांसाठी एक रूपया चौरस मीटर प्रमाणे जागा उपलब्ध करून दिली आहे.

याबाबत २३ नोव्हेंबरला जळगाव एमआयडीसीचे क्षेत्रीय व्यवस्थापक वासुदेव सपकाळे यांनी राज्य कर्मचारी विमा महामंडळ, मुंबई यांना रुग्णालयासाठी जागा मागणीचा प्रस्ताव ही दिला आहे. राज्य कर्मचारी विमा महामंडळाकडे लवकरच रुग्णालयासाठी जागा हस्तांतरित होणार आहे.

''औद्योगिक विकास महामंडळाने घेतलेला निर्णय इएसआयसी रुग्णालयासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणारा आहे. त्यामुळे महसूल, कामगार महामंडळ, इएसआयसी प्रशासनाने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.''-आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Rahul Dravid Son: ४८ ब्राऊंड्री अन् ४५९ धावा... द्रविडच्या धाकट्या लेकाच्या कारनामा; KSCA कडून झाला मोठा सन्मान

पालघरमधील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर! डहाणूत सामान्य, जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला तर पालघरमध्ये ओबीसीचे आरक्षण

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT