Amalner Marathi Sahitya Sammelan
Amalner Marathi Sahitya Sammelan esakal
जळगाव

Amalner Marathi Sahitya Sammelan : गुलाबी थंडीत काव्य मैफलीने आणली रंगत

सकाळ वृत्तसेवा

Amalner Marathi Sahitya Sammelan : ‘माईचा सोडून धरला पदर.. अशांची कवितेत कधीच केली नाही कदर.. अशा पुरुषांपासूनच कवितेला भीती होती... म्हणूनच ७०० वर्ष कविता जात्याभोवती जिती होती... या स्वरचित कवितेतून इंद्रजित भालेराव यांनी शुक्रवारी (ता.२) ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित काव्य मैफिलीत एक नवीनच रंगत आणली.

गुलाबी थंडीत कवींनी आपल्या काव्य सादरीकरणातून एक वेगळीच ऊब श्रोत्यांमध्ये निर्माण केली. (poetry concert organized at Amalner Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan jalgaon news)

या सत्रात निमंत्रित कवींनी विविध कविता सादर केल्या. या निमंत्रित कवींमध्ये अशोक सोनवणे (चोपडा), डॉ. विद्या देशपांडे, रमेश पवार (अमळनेर), सतीश सोळांकुरकर (ठाणे), दुर्गेश सोनार (नवी मुंबई), संगीता अरबुने (वसई), संकेत म्हात्रे (ठाणे), नामदेव कोळी (वांद्रे), शिवाजी गावडे (ठाणे), इंद्रजित भालेराव (परभणी)

विष्णू सुरासे, भास्कर पाटील, सुनीता कावसानकर (छत्रपती संभाजीनगर), बालाजी इंगळे (उमरगा), दिनकर जोशी (अंबाजोगाई), अमृता नरसाळे (रत्नागिरी), प्रा. प्रदीप कांबळे (सातारा), प्रा. अशोक वाबळे (चाळीसगाव), डॉ. विद्या देशपांडे (सोलापूर), अजित मालंडकर (कल्याण), वर्षा ढोके (सावनेर)

डॉ. संघमित्रा खंडारे (दर्यापूर), दीपक आसेगावकर (पुसद), सुरेश साबळे (बुलडाणा), सावन धर्मपुरीवार (हैदराबाद), व्यंकटेश कुलकर्णी (हैद्राबाद), प्रा. मीनाक्षी पाटील काळे (बिदर), राजू नाईक (तिसवाडी), अशोक शिरोडे (बिलासपूर), वैजयंती दांडेकर (वडोदरा), जया गाडगे (इंदौर)

अशोक कोतवाल, प्रकाश किनगावकर, शशिकांत हिंगोणेकर (जळगाव), रावसाहेब कुवर (साक्री), दीपक पाटील-चोपडा (नाशिक), डॉ. कुणाल पवार (अमळनेर), राजेसाहेब कदम (अहमदपूर) यांनी विविध विषयांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या कविता सादर केल्या.

कवी देविदास फुलारी (नांदेड) हे अध्यक्षस्थानी होते. कवी संजय चौधरी (नाशिक) यांनी सूत्रसंचालन केले. रात्री ‘छंद विठ्ठलाचा भावसरगम’ हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला.

यात गायक डॉ. अमोघ जोशी, गायिका मानसी कुलकर्णी-देशपांडे व सह कलाकार उपस्थित होते. स्वरसमन फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT