Police  esakal
जळगाव

RPFला मारहाण करणाऱ्या संशयिताची पोलिसांनी काढली धिंड

दहशत माजविणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी चांगला धडा शिकवत त्याची रेल्वेस्थानक परिसरातून धिंड काढून नागरिकांच्या मनातील भीती दूर केली.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : रेल्वेस्थानकावर विनापरवाना चणे, फुटाणे विक्री करणाऱ्याला हटकल्याचा राग आल्याने त्याने रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. दहशत माजविणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी चांगला धडा शिकवत त्याची रेल्वेस्थानक परिसरातून धिंड काढून नागरिकांच्या मनातील भीती दूर केली.

नासिर शेख आमीर शेख याने रेल्वेस्थानकावर व्यवसाय करू देत नाही म्हणत आरपीएफ राजकुमार महाराम जाटव व देवेंद्र जयलाल नेने यांना शिवीगाळ करून काठ्यांनी मारहाण केली. त्यावेळी वरिष्ठ अधिकारी तेथे आले असता संशयित पळून गेले. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल भुसारे, श्रीराम पाटील, अमोल पाटील, मधुकर पाटील यांनी संशयित नासिर शेख याला पकडून त्याने ज्या ज्या ठिकाणी दादागिरी करून रेल्वे पोलिसांना त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी नेऊन त्याची धिंड काढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT