जळगाव

रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत चार हजार वाहनांवर कारवाईचा दंडूका  ​

रईस शेख

जळगाव : जिल्हयात उपप्रादेशिक परिवहन विभाग, जळगाव शहर वाहतूक शाखा व राष्ट्रीय महामार्ग प्राधीरकरणतर्फे सडक सुरक्षा जीवन सुरक्षा या घोषवाक्याला अनुसरुन १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारीदरम्यान रस्ता सुरक्षा अभियान २०२१ राबविण्यात आले. 

अभियानादरम्यान जिल्हाभरात वाहतूक नियमांबाबत जनजागृती, जनजागृतीवर व्याख्यान, पथनाट्य, पॉम्प्लेट वाटप आदी कार्यक्रम पार पडले आहेत. आज १७ फेब्रुवारी रोजी या अभियानाचा समारोप झाला. महिनाभरात अभियानादरम्यान नियमांचे पालन न करणार्‍या ४ हजार १५९ चारचाकी तसेच दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात येवून १४ लाख ८३ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती शहर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक देवीदास कुनगर यांनी दिले आहेत. 

वाहतूक नियमांचे प्रबोधन 
जळगाव जिल्हयात १८ जानेवारी रोजी रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पथनाट्यांसह पॉम्प्लेट, वाटप, मार्गदर्शन शिबिर या माध्यमातून वाहतुक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात ४० पथनाटय पार पडले. शाळा महाविद्यालयांमध्येही शहर वाहतूक शाखेतर्फे वाहतूक नियमांबाबत प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडले. आज या अभियानाचा जळगाव शहरातील बेंडाळे महाविद्यालयातील कार्यक्रमाने समारोप झाला आहे. 

नियम मोडणारे टार्गेट वर 
महिनाभराच्या अभियानात कारवाईची मोहिम राबविण्यात आली. यात सीटबेल्ट नसणे, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे, ट्रीपल सीट, चुकीच्या बाजूने वाहन चालविणे, वेगाने वाहन चालविणे अशापध्दतीने नियमांचे पालन न करणार्‍या एकूण ४ हजार १५९ वाहनांवर कारवाई करण्यात येवून १४ लाख ८३ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अशी माहिती जळगाव शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक देवीदास कुनगर यांनी दिली आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT