mother 
जळगाव

शोधून शोधून थकली..व्याकूळ होवून बसली; अचानक ‘आऽऽई’ हा शब्द कानावर आला आणि सारेच निशब्द!   

रईस शेख

जळगाव : शहरातील स्टेडियम परिसर ते मध्यवर्ती बसस्थानकदरम्यान रस्त्याने रडत फिरणाऱ्या चिमुरडी पोलिस कर्मचाऱ्याला दिसली. पोलिस कर्मचारी यांनी मुलीला थांबवून चौकशी करत मदतीचा हात पुढे केला. आईसोबत बँकेत आलेल्या या बालिकेची व आईची गर्दीमुळे ताटातूट होऊन बालिका रडून रडून थकली होती.

आईशी ताटातूट झाल्यानंतर रडून रडून थकलेल्या चिमुरडीवर पोलिस कर्मचारी प्रमोद पाटील यांची नजर पडली. त्यांनी तिला तत्काळ दुचाकीवर बसवून पोलिस ठाण्यात आणले. तिच्या आवडीचे बिस्कीट, पिण्यास पाणी दिल्यानंतर चिमुरडी शांत झाली.

आणि आईचा सुरू झाला शोध

जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात साध्या वेशातील महिला कर्मचाऱ्यांनी तिची चौकशी केली असता, दीप्ती देवानंद मेढे (वय ५) असे तिचे नाव असल्याचे समजले. त्यानंतर श्री. पाटील व प्रवीण भोसले परत तिला दुचाकीवर घेऊन आईच्या शोधात निघाले.

आवर्जून वाचा- दुश्मनी काढण्याठी कंबरेला पिस्तूल, खिशात काडतूस; पण गुन्हा करण्यापूर्वीच गेले कोठडीत
 

मायलेकीची भेट 
बालिकेने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या आईचा शोध घेत पोलिस नवीन बसस्थानक ते थेट कोर्ट चौकापर्यंत चौकशी करत होते. नंतर स्टेटबँकेच्या आवारात मुलीला शोधून थकलेली तिची आई, उदास चेहऱ्याने डोक्याला हात लावून बसलेली हेाती. तिला बघताच दीप्तीने ‘आऽऽई’ म्हणून हाक मारताच, ताड्‌कन उभे राहून आईने मुलीला कवेत घेत मुक्यांचा वर्षाव करत लाड केले. हे चित्र बघून परिसरातील नागरिकही काही काळ सद्‌गदीत झाले होते.  

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT