crime news esakal
जळगाव

Jalgaon : गावठी दारुच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा

आसरबारी पाड्याच्या शिवारातील धरणाच्या चारीजवळ अनधिकृतरित्या गावठी दारू तयार करणाऱ्यांवर येथील पोलिसांनी छापा टाकला.

प्रतीक जोशी

यावल (जि. जळगाव) : वड्री (ता. यावल) जवळील आसरबारी पाड्याच्या शिवारातील धरणाच्या चारीजवळ अनधिकृतरित्या गावठी दारू तयार करणाऱ्यांवर येथील पोलिसांनी छापा टाकला. यात गावठी दारूसह दारू तयार करण्याचे कच्चे रसायन आणि साहित्य असा १३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करुन याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

येथील प्रभारी पोलिस निरीक्षक आशित कांबळे यांना मिळालेल्या माहितीनुसार वड्री (ता. यावल) गावाजवळील आसराबारीपाडा परिसरात धरणाच्या चारीच्या आडोशात गावठी दारुच्या हातभट्टीवर दारू गाळण्याचे काम सुरु आहे. त्यानुसार, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला असता, मोहसीन सत्तार तडवी हा बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू गाळताना मिळून आला. त्याच्याकडून तयार दारू, कच्चे रसायन आणि दारू तयार करण्याचे साहित्य असा १३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक फौजदार असलम खान करीत आहे. ही कारवाई सहायक फौजदार असलम खान दिलावर खान, हवालदार बालक बाऱ्हे, सुशील घुगे, राजेश वाढे, रोहिल गणेश, गणेश ढाकणे यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT