police raided and destroyed 6 liquor kiln in village jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : 6 दारूभट्ट्या उद्धवस्त

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : तालुका पोलिसांनी छापा टाकून गावठी दारूच्या सहा भट्ट्या (liquor kiln) उद्धवस्त केल्या. पोलिसांनी शेकडो लिटर कच्चे रसायन, तयार दारू नष्ट केली.

सहा संशयितांविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. (police raided and destroyed 6 liquor kiln in village jalgaon news)

नांद्रा-बुद्रुक, भोलाणे, पळसोद, असोदा व सावखेडा येथे अवैध गावठी दारू पाडण्यात येत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस पथकाने नांद्रा बुद्रुक येथील शांताराम व्यंकट सोनवणे (वय ६०) याच्याकडून एक हजार २०० रुपयांची ३० लिटर दारू,

भोलाणे येथील राकेश मधुकर कोळी (वय २७) याच्याकडून दीड हजाराची ३० लिटर दारू, पळसोद येथील रतिलाल राजाराम सोनवणे (वय ६१) याच्याकडून हजार रुपयाची २५ लिटर दारू, असोदा येथील विजय प्रकाश कोळी (वय ३८) याच्याकडून दीड हजाराची ३० लिटर दारू,

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

सावखेडा बुद्रुक येथील सिद्धार्थ मधुकर सोनवणे (वय ४२) याच्याकडून एक हजार २०० रुपयांची ३० लिटर व गोरख सोनू सोनवणे (वय ३५) याच्याकडून हजार रुपयाची २५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. या सर्वांविरुद्ध रविवारी (ता. १२) दुपारी दोनला जळगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पंजाब किंग्सचा सलग चौथा पराभव; दिल्ली कॅपिटल्सने Playoff चे गणित बिघडवले; CSK, KKR, RR ला संधी...

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

SCROLL FOR NEXT