Jalgaon Crime News : गिरणा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या जेसीबी, ट्रॅक्टर, डंपरवर चाळीसगाव विभागीय सहायक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धडक कारवाई केली. (Police team action against sand thieves in Bhadgaon jalgaon news)
गिरणा नदीपात्रात सहायक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या पथकाने छापा टाकला असता गिरणा नदीत परमेश्वर राजपूत (रा. महिंदळे), प्रदीप पाटील (रा. वडदे), ज्ञानेश्वर सोनवणे (रा. कोठली), राहुल महाजन हे वाळू भरताना आढळून आले. जवळच वाळूने भरलेले ४ ट्रॅक्टर, २ जेसीबी, १ डंपर आढळले.
हे वाहन ताब्यात घेऊन वरील चौघांविरुद्ध पोलिस नाईक भगवान पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या कार्यवाईत ८३ लाख २४ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आला आहे. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पथकात सहायक निरीक्षक सागर ढिकले, पोलिस कर्मचारी राजेंद्र निकम, महेश अरविंद बागूल, विश्वास देवरे, श्रीराम कांगणे, राहुल महाजन, समाधान पाटील, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे, नंदकिशोर महाजन, पवन पाटील, विकास पाटील, भगवान पाटील यांच्यासह अधिकारी व अंमलदार सहभागी होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.