जळगाव

मला 'ईडी'च्या तारखा पाहून कोरोना होत नाही'

भूषण श्रीखंडे

जळगाव ः सद्या राज्यात कायदा सुव्यवस्थेची गंभीर परिस्थीती  निर्माण झालेली असून महिलांचा खून, बलात्कार होताय, अधिकारी शंभर कोटीच्या खंडण्या वसूल करण्यासाठी मारून टाकण्याचे प्रकार घडता आहेत. आणि गुन्हा करण्यांवर गुन्हाच दाखल केला जात नसून महाराष्ट्रात कायदा शिल्लक आहे की नाही असा प्रश्न पडलेला आहे. अशी गंभीर परिस्थीती माझ्या तीस वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात मी पहिल्यांदा अनुभवतोय. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यस्थेचे लक्तरे तोडले जात असून पोलिस यंत्रणचे मॅारल डाऊन झाले आहे. मंत्री वाट्टेल तसे मागण्या व अत्याचार करत आहे. असे माजी मंत्री तथा भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी ठाकरे सरकारवर आरोप करीत हल्ला बोल केला.  

माजी मंत्री तथा भाजप आमदार गिरीश महाजन आज जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महिला रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार गिरीश महाजन पुढे बोलतांना म्हणाले, की गृहमंत्री अमित शहा आणि  शरद पवार यांच्या भेटी बाबत मला काही माहित नाही. गेले तिन आठवडे मला कोरोना झाल्यामूळे रुग्णालयात उपचार घेत आहे. मी आजच जळगावात आलो आहे. त्यामुळे मला याबद्दल काही माहित नाही. मात्र उद्यापासून पश्चीम बंगाल मधील निवडणूकीच्या प्रचारासाठी मी जाणार आहे.

मला इडीचा कोरोना नाही

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडेंवर देखील खोचक टिका करतांना गिरीश महाजन म्हणाले, की मला इडीच्या तारखा पाहून असा कोरोना झालेला नाही. माझ्यासह माझ्या घरातील सर्वच कुटूंब कोरोना बाधित होते आणि सर्व शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. कालच माझी चाचणी निगेटिव्ह आली आहे. परंतू इडीच्या तारख्या आल्या की खोटे रिपोर्ट बनवून कोरोना दाखवायचा आणि क्वारंटाईन व दवाखान्यात भरती होण्याचे खोटेपणा मी काही दाखवलेला नाही. आता सगळ्यांनाच कोरोना होत आहे असे सांगून खडसेंवर महाजनांनी शाब्दीक टिका केली. 

सोडून गेलेले नगरसेवकांचे काय करायचे बघू 
जळगाव महापालिकेतील शिवसेनेने संधी साधून मोठी घोडेबाजारी केली. सत्ता आपली असून तुम्हाला काही होवू देणार नाही असे सांगून भाजपचे नगरसेवक त्यांनी फोडले. ठिक आहे आता पुढे या नगरसेवकांचे काय करायचे ते बघू, पक्षांतर्गत कायद्या नुसार कारवाई कशी करायची ती आम्ही बघू असा इशारा गिरीश महाजन दिला.  

आमदाराला तुरंगात ठेवणे कितपत योग्य 

चाळिसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याबाबत महाजन यांना विचारले असता एखादा आमदार शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले म्हणून त्याला वरून फोन येवून तुरंगात डांबले जातेय हा कुठला प्रकार आहे. शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन केले आहे. पण आम्ही कोरोनामुळे शांत बसलो असून आम्ही एक आव्हान केल्यावस हजारो शेतकरी रस्त्यावरील उतरतील असा इशारा महाजन यांनी यावेळी दिला. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DSK Case: डीएसके प्रकरणात ठेवीदारांना मोठा दिलासा; ५७२ कोटींच्या मालमत्ता लिलावाच्या अर्जावर तीन महिन्यांत निर्णय

IIT Bombay Exam: आयआयटी बॉम्बे परीक्षेत गैरप्रकार? कॉपीसाठी ७०० रूपयांच्या मोबाईलचा वापर, पोलिसांकडून तपास सुरू

इंदिरा गांधींची हत्या करणाऱ्याच्या मुलाला विधानसभेचं तिकीट, पंजाब निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, एक जण जखमी

Vaibhav Sooryavanshi: वय अवघं १५, संपत्ती कोट्यवधींच्या घरात! वैभव सूर्यवंशीसोबत जोडले गेले ‘हे’ ५ मोठे ब्रँड; कमाईचा आकडा ऐकून व्हाल थक्क!

SCROLL FOR NEXT