जळगाव

खडसेंच्या दारी फडणवीस...अनेकांच्या उंचावल्या भुवया

अनेक आरोपांचा सामना करावा लागला. त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे त्यांना मंत्रीपदही गमावावे लागले होते

भूषण श्रीखंडे

जळगाव ः माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांनी भाजपला सोड चिठ्ठी दिल्यानंतर पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी नियोजीत मुक्ताईनगर दौऱ्यात सर्वात प्रथम खडसेंचे कोथळी गावातील घरी खासदार रक्षा खडसेंची भेट घेतली. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेल्यानंतर फडणवीस यांची खडसेच्या घरी रक्षा खडसेंची (MP Raksha Khadse) भेट ही महत्वाची मानली जात आहे.

(Devendra Fadnavis visited Eknath Khadse's house)

वादळामूळे मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पाहणी करण्यासाठी श्री. फडणवीस आज मुक्ताईनगर व रावेर तालुक्याच्या दौऱ्यावर आले आहे. सकाळी जामनेरवरून थेट मुक्ताईनगरला ते आले. तेथे खासदार रक्षा खडसे यांच्या घरी आले. यावेळी आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan), अशोक कांडेलकर, राजेंद्र फडके आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी श्री फडणवीस यांनी चहा, नाष्टा केला. तर खासदार रक्षा खडसेंचा मुलगा गुरू व मुलगी क्रिषीकाला श्री. फडणवीसांनी आर्शिवाद दिला.

खडसे-फडणवीस मतभेद

वादळामूळे मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पाहणी करण्यासाठी श्री. फडणवीस आज मुक्ताईनगर व रावेर तालुक्याच्या दौऱ्यावर आले आहे. सकाळी जामनेरवरून थेट मुक्ताईनगरला ते आले. तेथे खासदार रक्षा खडसे यांच्या घरी आले. यावेळी आमदार गिरीश महाजन, अशोक कांडेलकर, राजेंद्र फडके आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपची सत्ता राज्यात असतांना श्री. फडणवीस व श्री खडसे यांच्यातील मतभेद सर्वश्रूत आहे. मुख्यमंत्री पदाच्या आशेपोटी श्री खडसेंना अनेक आरोपांचा सामना करावा लागला. त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे त्यांना मंत्रीपदही गमावावे लागले होते. तेव्हापासून श्री खडसे व श्री फडणवीस यांच्यात मतभेद आहे. वेळ मिळेल तेव्हा दोन्ही नेते एकमेकांवर आरोपांची तोफ डागत असतात.

खडसेंनी दिली होती भाजपला सोडचिठ्ठी

दोन वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर श्री खडसे यांनी भाजपमध्ये योग्य सन्मान न मिळाल्याचे कारण सांगत भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर त्यांच्या सुन खासदार रक्षा खडसे या भाजपमध्येच आहेतं,

भेटीची सर्वत्र चर्चा

आजच्या वादळी नुकसान पाहणी दौऱ्यावेळी श्री फडणवीस यांनी खडसेंच्या कोथळी येथील निवासस्थानी भेट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीची राजकीय क्षेत्रात विविध प्रकारच्या चर्चेला उधान आले होते. यानंतर श्री फडणवीस वादळ्याच्या नुकसान पाहणीसाठी गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT