जळगाव

पदाधिकारी राष्ट्रवादीचा, गमछा भाजपचा आणि प्रवेश सत्कार मनपा अधिकाऱ्यांचा; काय आहे हा प्रकार? जाणून घ्या  

भूषण श्रीखंडे

जळगाव ः जळगाव महानगर पालिकेतील बांधकाम विभाग व नगररचना विभागातील अधिकारी बुधवारी भाजपच्या पार्टी मिटींगमध्ये गेल्याचा अजब प्रकार घडला होता. त्यामुळे आज घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी महापालिकेत येवून स्थायी समितीची सभा संपल्यानंतर सभागृहाच्या प्रवेशद्वारावर भाजपच्या बैठकीला गेलेले अधिकाऱ्यांना भाजपचा गमछा घालून त्यांना भाजप सदस्य होण्याचा सत्कार केल्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे महापालिकेच्या सभागृहाबाहेर एकच गोंधळ उडाला तर या प्रकारामुळे महापालिका परिसरात या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू होती.

जळगाव महानगर पालिकेवर भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता असून गुरूवारी स्थायी समितीची सभा होती. सभेच्या एक दिवस आगोदर पार्टी मिटींग घेण्यात येते. ही मिटींग महापालिकेत भाजपाने न घेता भाजपाचे वसंत स्मृती कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीला भाजपचे आमदारांसह पदाधिकारी, महापौर, स्थायी सभापती, नगरसेवक, स्थायी सदस्य उपस्थित होते. परंतू या बैठकीला महापालिकेचे शहर अभियंता, नगररचना विभागाचे अभियंत्यांना देखील बोलावून सभेच्या अंजेड्यावरील विषयांवरून माहिती घेण्यात आली. परंतू पक्षाच्या मिटींगमध्ये महापालिकेचे अधिकारी जाणे,एका पक्षाच्या कार्यालयात ते ही कर्तव्यावर असतांना असा प्रकार बुधवारी घडला. या प्रकारावर आज दुपारी स्थायी समितीची सभा संपल्यानंतर अधिकारी सभागृहाच्या बाहेर पडत असतांना राष्ट्रवादीचे जळगाव शहर महानगराध्य अभिषेक पाटील यांनी या अधिकाऱ्यांचा सत्कार करून भाजपात प्रवेश दिला.

गमछा घालून दिले सदस्यत्व..
राष्ट्रवादीचे महानराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी भाजपचा गमछा महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या गळ्यात घातला. तसेच आजपासून तुम्ही भाजपचे सदस्य झाल्याचे सांगून सत्कार करून स्वागत केले. या झालेल्या प्रकारामुळे या अधिकाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. तर महापालिकेच्या वर्तुळात या घटनेबाबत एक चर्चा सुरू होती. 

महापालिकेत भाजपाची एक हाती सत्ता असली म्हणून काय झाले ते मनमानी कारभार करत आहे. त्याच हद्द झाली असून बुधवारी त्यांनी त्यांच्या पार्टी मिटींगला महापालिकेचे अधिकाऱ्यांना थेट पक्षाच्या कार्यालयात बैठकीला बोलावून घेतले. आणि महापालिकेचे अधिकारी देखील शासकीय नियम मोडून या बैठकीला जाणे ही शरमेची बाब आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर वचक रहावा म्हणून राष्ट्रवादीतर्फे त्यांचा सत्कार केला आहे.

- अभिषेक पाटील- महानगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष, जळगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT