जळगाव

राजकारणातील सद्‌प्रसंग; कार्यकर्त्याचा वाढदिवशी नेत्याची भावस्पर्शी भेट

आपल्या जुन्या कार्यकर्त्यांप्रतिची भावना, प्रेम आणि ऋणानुबंधही कायम आहेत

सचिन जोशी

जळगाव : काही वर्षांत नेता आणि कार्यकर्त्याच्या नात्यातील ऋणानुबंध हरवत चाललेला असताना एखादा नेता (Leader) वाट बदलूनही आपल्या जुन्या, ज्येष्ठ कार्यकर्त्याला त्याच्या वाढदिवशी (Birthday) स्वत:चे वाहन पाठवून घरी बोलावून घेतो. त्याचे औक्षण केले जाते. सोबत जुन्या स्मृतींना उजाळा देत चहापानही होते. हा प्रसंग जेवढा आश्‍चर्यकारक (Surprising) तेवढाच भावस्पर्शीही.


( ncp leader eknath khadse activist birthday surprising wish)

कार्यकर्त्यांना जीव लावणारा नेता म्हणून माजी मंत्री एकनाथ खडसे यांची (Former Minister Eknath Khadse) ओळख. आयुष्यातील ३५ वर्षांच्या वाटचालीत त्यांनी हजारो कार्यकर्ते जोडले, त्यांच्याशी ऋणानुबंध स्थापित केले. परवापर्यंत भाजपत (BJP) असताना आणि आता सहा- सात महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीची (NCP) वाट धरल्यानंतरही त्यांची आपल्या जुन्या कार्यकर्त्यांप्रतिची भावना, प्रेम आणि ऋणानुबंधही कायम आहेत. त्याचा प्रत्यय यानिमित्त आला.


प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे या दिवंगत नेत्यांशी ऋणानुबंध असलेले भाजपतील ज्येष्ठ कार्यकर्ते, तत्कालीन वैद्यकीय आघाडीचे प्रमुख डॉ. सुरेशचंद्रसिंह सूर्यवंशी यांचा गुरुवारी (ता. २७) वाढदिवस होता. सकाळी साडेसात- आठला त्यांना फोन येतो. ‘डॉक्टरसाहेब, आपल्या घरासमोर माझी गाडी आहे. त्यात बसा आणि या मुक्ताईनगरला’ समोरून खडसेंचा हक्काचा आदेश होतो. डॉक्टर फ्रेश होऊन मुक्ताईनगरच्या वाटेला निघतात. का बोलावले असेल? असा प्रश्‍न त्यांच्या मनात.

औक्षण अन्‌ चहापान
खडसेंच्या फार्महाउसवर डॉक्टर पोचतात. कापऱ्या आवाजात खडसे त्यांचे स्वागत करतात. ‘काही विशेष नाही, आपला वाढदिवस आहे. तो इथेच साजरा करू, म्हणून बोलावलं’ असं म्हटल्यानंतर डॉक्टर अचंबित होतात. डॉक्टरांचं औक्षण होतं. चहापानासोबत दोघेही गप्पांमध्ये रंगतात.

स्मृतींना उजाळा
भाजपत असतानाचे सुरवातीचे दिवस समोर उभे राहतात. प्रमोदजींपासून, मुंडेसाहेब, नितीनजी. अगदी अडवानी, अटलजींपर्यंतच्या स्मृतींना उजाळा मिळतो. अलीकडे भेटच होत नाही, म्हणून दोघेही भरभरून बोलतात. भाजपच्या या वाटचालीतील काही प्रसंगांनी खडसे अन्‌ डॉक्टर दोघेही भावूक होतात. तासभराची ही भावस्पर्शी भेट संपते. डॉक्टर परत जळगावच्या वाटेला निघतात. स्वत: डॉ. सूर्यवंशी यांनी व्यक्त केलेल्या या भावना खडसे अन्‌ त्यांचे कार्यकर्त्यांमधील पक्षातीत ऋणानुबंध अधोरेखित करतात.

( ncp leader eknath khadse activist birthday surprising wish)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT