जळगाव

'कटप्पा ने बाहूबली को क्यों मारा' असे पून्हा का म्हणाले जलसंपदा मंत्री  

दिपक चौधरी

मुक्ताईनगर : 'कट्टपा ने बाहुबली को क्यो मारा' क्योकी बाहुबली आगे आता तो उस्को बाहर जाना पडता म्हणत आपल्या गाजलेल्या वक्तव्याचे पुनरुच्चार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुक्ताईनगरातील राष्ट्रवादीचा जनसंवाद यात्रेत दिला. 

मुक्ताईनर येथे जनसंवाद यात्रेचा कार्यक्रम रात्री उशीरा झाला. यावेळी याप्रसंगी जयंतराव पाटील, एकनाथराव खडसे , रोहिणी खडसे रूपालीताई चाकणकर ,सक्सेना सलगर, माजी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार संतोष चौधरी , राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट रवींद्र पाटील, माजी आमदार अरुण पाटील, विनोद तराळ, बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील, मुरलीधर तायडे, मेहबूब शेख, राजेश वानखेडे, माजी आमदार मनीष जैन यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

पाच वर्षाचा बॅकलाॅग भरून काढू- पाटील
कुऱ्हा वडोदा उपसा बोदवड आणि मुक्ताई उपसाचा आढावा घेऊन या योजनांची कामे प्राधान्याने व तात्काळ केले जातील. तसेच लवकरच मेगा रिचार्ज ला चालना देऊ मागील ५ वर्षाचे बॅकलॉग भरून काढू असे आश्वासन त्यांनी दिले.

गद्दारांची फौज आता बाहेर आली आहे- खडसे

माजी मंत्री खडसे यांनी आपल्या भाषणात  गद्दारांची फौज आता बाहेर आली आहे. त्यांना आता धडा शीकविण्याची वेळ आली आहे, असे सांगत यांनीच रोहिणी खडसे यांना पाडले. त्या साठी पैसा ही पुरविला. मी पक्ष सोडला नाही तुम्हीच सोडण्यास भाग पाडले. ज्याना बोट धरून पुढे आणले मोठे केले ते आज गद्दार झाले. जे बापाला झाले नाही ते तुम्हाला काय होणार म्हणत खडसे यांनी भाजपातील आपल्या विरोधकांचा समाचार घेतला. पवार साहेबांनी नाथाभाऊंचे राजकीय पुनर्जज्जीवन केले. राष्ट्रवादी पक्ष वाढविण्याची जवाबदारी आपल्या वर आली असल्याचे त्यांनी सांगितले.

पाण्यापासून नागरिकांना वंचित ठेवले- रोहिणी खडसे
एकनाथराव खडसेचा मतदार संघ असल्याने च मतदार संघातील उपसा सिंचन योजना मुद्दाम रखडून ठेवली. आणि जनतेला पाण्या पासून वंचित ठेवले असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी आपल्या भाषणात बोलतांना सांगितले.

अनेकांनी राष्ट्रवादीत केला प्रवेश

सभेत मुक्ताईनगर, बोदवड पंचायत समिती सभापती आणि सदस्य  मुक्ताईनगर नगरपंचायत काही सदस्य सावदा नगराध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व संचालक आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

SCROLL FOR NEXT