eknath khadse
eknath khadse 
जळगाव

एकनाथ खडसे 'ईडी' च्या कार्यालयात उद्या चौकशीसाठी स्वतः हजर राहणार ! 

कैलास शिंदे

जळगाव :राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eeknath Khadse) यांची उद्या (ता.१५) सक्तवसुली संचलनालय (ईडी)तर्फे चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीसाठी ते स्वत: हजर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

भोसरी येथील भुखंड खरेदी प्रकरणी चौकशीसाठी सक्त वसुली संचलनालय (ईडी)ने एकनाथराव खडसे यांना नोटीस बजावली आहे. ३० डिसेबर रोजी चौकशीसाठी त्यांना मुबंई येथील कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. या चौकशीसाठी खडसे मुंबईला २७ डिसेबरला रवाना झाले होते. त्या ठिकाणी त्यांनाआजाराची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांची ‘कोरोना’चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना १४ दिवस क्वारंटाईन राहण्याचे कळविले होते. याबाबत त्यांनी ‘ईडी’कार्यालयास कळवून मुदत मागून घेतली होती. त्यानीही त्यांच मुदत मंजूर केली होती. त्यांना देण्यात आलेली मुदत आता संपली आहे. ‘ईडी’कार्यालयाने चौकशीसाठी उद्या (ता.१५) रोजी हजर राहण्याचे कळविले आहे. 

आवर्जून वाचा- 'ती' च्या जिद्दीला सलाम.. गावाच्या समृद्धीसाठी एकटीचा लढा ! 

खडसे स्वत:हजर राहणार.. 
एकनाथराव खडसे मुंबईतील ‘ईडी’कार्यालयात चौकशीसाठी स्वत:हजर राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत त्यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, कि, खडसे स्वत: मुंबईतील ‘ईडी’ कार्यालयात चौकशीसाठी उद्या (ता.१५) सकाळी अकरा वाजता जाणार आहेत. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Latest Marathi News Update : पुलवामा येथे बोट उलटली, दोन जण बेपत्ता

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : पूरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

SCROLL FOR NEXT