Positive Effects of Cartoon Shows on Children esakal
जळगाव

‘कार्टून शो’चे सकारात्मक परिणाम; मुलं मॅनर्स शिकतायेत, कलागुणांचाही विकास

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : टीव्हीवर ‘कार्टून शो’समोर बसलेली मुलं अन्‌ त्यांच्यावर संताप करणारे पालक.. बहुतांश घरांमधील हे सार्वत्रिक चित्र. पण, या ‘कार्टून शो’मधूनही मुलांमध्ये काही सकारात्मक बदल घडल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

या कार्यक्रमांमधून मुलं मॅनर्स शिकत असून इंग्रजीतील शब्दांचे उच्चार, कलागुणांचा विकास या गोष्टीही शिकायला मिळत आहेत. (Positive Effects of Cartoon Shows Children learn manners develop talents to Jalgaon Latest Marathi News)

केसीई सोसायटीत शिक्षण समन्वयक म्हणून कार्यरत चंद्रकांत भंडारी हे पाल्य- पालकांचे मार्गदर्शक आणि पाल्यांमधील विविध प्रश्‍नांचे अभ्यासक म्हणूनही परिचित आहेत. त्यांनी सातत्याने ‘कार्टून शो’ बघणाऱ्या मुलांमधील बदलांचे निरीक्षण केले.

पालकांनाही त्यांनी या बदलांचे निरीक्षण नोंदवून घेण्याची सूचना केली. त्यानुसार काही पालकांनी त्यांना यासंदर्भात मुलांबद्दल आलेले अनुभव शेअर केले.

असे आहेत अनुभव

शालेय विद्यार्थ्यांमधील साधारणत: ५ ते १२ वर्षे वयोगटातील विद्यार्थी कार्टून शो सातत्याने बघतात. प्रसंगी त्यांचे खाण्यापिण्याकडेही दुर्लक्ष होते. डोळे खराब करण्याचे कारण देत पालक मुलांना बऱ्याचदा रागावतातही. पण, त्यातूनही काही सकारात्मक बदल व परिणाम समोर आले आहेत.

असे आहेत बदल

कार्टून शो बघत असल्याने मुलांचे इंग्रजी सुधारते. इंग्रजीत विविध शब्दांचे उच्चार कसे करावे, याचा अभ्यास होतो. टॉम ॲण्ड जेरी व अन्य काही शोमधून सार्वजनिक ठिकाणी कोणते ‘मॅनर्स’ पाळायचे याचेही ज्ञान झाल्याचे निरीक्षण आहे.

विविध भाषिक आणि शारीरिक कौशल्यांचे ज्ञान होते. कलागुणांच्या विकासालाही चालना मिळते. कार्टून शोमध्ये दाखविण्यात येणाऱ्या गोष्टींमधून मुलांमध्ये घर व परिसर स्वच्छता, स्वावलंबन आदी चांगल्या सवयीही लागल्याचे सांगण्यात येतेय.

अशा प्रकारच्या सकारात्मक परिणामांच्या नोंदीसाठी २० मुलांचा ग्रुप करण्यात आला. त्यातील धनंजय या मुलाने हे अनुभव शेअर केलेत. भाषिक व शारीरिक कौशल्यासह हस्तकौशल्येही मुलांमध्ये विकसित झाल्याची भावना या मुलांमधील काही मुलांच्या पालकांनी व्यक्त केली.

"‘कार्टून शो’ सतत पाहणे तसे वाईटच. पण, काहीवेळ पाहून त्यातील चांगल्या सवयी, सकारात्मक बाबींचे अनुकरण करायला काय हरकत आहे? आणि मुलांमध्ये या ‘कार्टून शो’चा हाच चांगला परिणाम झाल्याचे दिसून येतेय." - चंद्रकांत भंडारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT