वीजचोरी  sakal
जळगाव

वीजचोरी अन्‌ गळतीचा ‘बोजा’ प्रामाणिक ग्राहकांवर

खानदेशातील स्थिती; २४ टक्‍के गळतीने मोठा फटका

राजेश सोनवणे

जळगाव : जिल्ह्यात वीजबिल भरण्याचे ग्राहकांचे प्रमाण चांगले आहे. बिल प्रामाणिकपणे भरले जात असले तरी जिल्ह्यात विजेचा अनधिकृत वापर, विजेची चोरी, शॉर्टसर्किट यामुळे होणारे गळतीचे प्रमाण २४.२३ टक्के आहे. या गळतीचा महावितरणला मोठा फटका बसत असून, त्यामुळे प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांनाही मूळ बिलापेक्षा २४ टक्के अतिरिक्त बिल भरावे लागते असेच म्‍हणावे लागेल.

वीज कंपनीचा जो ग्राहक प्रामाणिक वीजबिल भरेल, त्याला महावितरणकडून २४ तास वीज दिली जाते. त्यासाठी ए., बी., सी., डी., ई आणि एफ असे फीडरचे भाग करण्यात आले आहेत. यात डी. ई व एफ या फीडरवर अधिक भारनियमन केले जाते. मात्र सध्‍या राज्‍यात कोठेही भारनियमन होत नाही. असे असले तरी गळतीचे प्रमाण वाढत आहे. या वाढत्‍या गळतीचा भार प्रामाणिक ग्राहकांवर पडत आहे. यामध्‍ये जळगाव परिमंडलाची वितरण हानी २४.२३ टक्के आहे.

साडेनऊ कोटींची वीजचोरी

आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्यांस मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. यात जळगाव परिमंडळात एप्रिल-२०२१ ते डिसेंबर-२०२१ या आठ महिन्यांत मोठ्या संख्येने वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. नऊ महिन्यांत सहा हजार १३ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्‍याकडून साधारण ६७ लाख ९९ हजार ७८१ युनिटद्वारे नऊ कोटी ४० लाखांची वीजचोरी केली आहे.

खानदेशातील वीजचोरी

जिल्‍हा प्रकरण युनिट वीजचोरीची रक्‍कम

जळगाव ४३६३ ५२ लाख ६२ हजार ५७५ सहा कोटी ९८ लाख

धुळे ९१५ ७ लाख ५६ हजार २३६ एक कोटी पाच लाख

नंदुरबार ७३५ ७ लाख ८० हजार ९७० एक कोटी ३६ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

SCROLL FOR NEXT