Ganeshotsav 2023  esakal
जळगाव

Ganeshotsav 2023 : वरुणराजाच्या आगमनाने गणेशभक्तांमध्ये चैतन्य! एरंडोलला गणेशोत्सवाच्या तयारीला वेग

आल्हाद जोशी

Ganeshotsav 2023 : शहरात गणेशोत्सवाची तयारी वेगात सुरू असून, गणेश मंडळांचे पदाधिकारी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात व्यस्त झाले आहेत. महिनाभरापासून गायब झालेल्या पावसाचे आगमन झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह वाढला आहे.

गणेशोत्सवात दहा दिवस विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्यामुळे भाविक देखील गणरायाच्या आगमनाची वाट पाहत आहेत.

शहरात अठरा सार्वजनिक गणेश मंडळांसह विविध नवीन वसाहतींमध्ये श्रीगणेशाची स्थापना केली जाते. (Preparations for Ganeshotsav speed up in erandol jalgaon news)

जयगुरू व्यायामशाळा, संत सावता माळी व्यायामशाळा, जयहिंद व्यायाम शाळा, बालवीर गणेश मंडळ, बालमित्र गणेश मंडळ, नम्रता गणेश मंडळ, ज्ञानदीप मित्रमंडळ, जय बजरंग गणेश मंडळ, माहेश्वरी नवयुवक गणेश मंडळ, अखिल ब्राह्मवृंद गणेशमंडळ, सर्वोदय मित्रमंडळ, पांडववाडा मित्रमंडळ, हरीपुरी युवक मंडळ, नागराज गणेश मंडळ, बालाजी गणेश मंडळ, भगवा चौक गणेश मंडळ, जय संताजी गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ, श्रीराम मित्रमंडळ या सार्वजनिक मंडळांसह विविध लहान मंडळे व घराघरांत श्रीगणेशाची उत्साहात स्थापना केली जाते. सार्वजनिक मंडळांकडून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

श्रीगणेशाच्या स्थापना व विसर्जन मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी होत असतात. नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांकडून गणेश मंडळांना मोठ्या प्रमाणावर सर्व प्रकारचे सहकार्य केले जाते. गणेश मंडळाच्या

माध्यमातून राजकीय व सामाजिक क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध होत असल्यामुळे गणेशोत्सवात युवक पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. जयगुरु व्यायामशाळा, श्री सावता माळी व्यायामशाळा, नागराज मित्रमंडळ यासह प्रमुख मंडळांच्यावतीने भव्य गणेशमूर्तींची स्थापना करण्यात येत असते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महसूल कर्मचारी, पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, शांतता समिती सदस्य, पालिका कर्मचारी, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी सहकार्य करीत असतात. कोरोनाच्या संकटात शहरातील सर्व गणेश मंडळांच्या पदाधिका-यांनी प्रशासनाने केलेल्या ‘एक गाव-एक गणपती’ या आवाहनास प्रतिसाद देऊन एकाच

गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून आदर्श उभा केला होता. सुमारे पंधरा ते वीस वर्षांपूर्वी वनकोठे (ता. एरंडोल) येथील वसंत सहकारी साखर कारखाना, पंचायत समिती आणि गिरणा पाटबंधारे विभाग यांच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत होते. सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामीण भागातून हजारो भाविक कारखाना, पंचायत समिती आणि गिरणा कॉलनी येथे येत असत.

मात्र कारखाना बंद पडल्यामुळे आणि पंचायत समिती आणि गिरणा पाटबंधारे विभागातर्फे होणारा गणेशोत्सव बंद पडल्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांपासून रसिकांना वंचित राहावे लागत आहे. गणेशोत्सवात उत्कृष्ट आरास सजावट करणे, आकर्षक देखावे, समाजप्रबोधन व सार्वजनिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करणे आदी निकषांवर आधारित गणेश मंडळांना नगरपालिका, (कै.) बळवंत विष्णू विसपुते सार्वजनिक वाचनालयातर्फे बक्षीस दिले जात असतात. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महसूल व पोलिस प्रशासनातर्फे सर्व गणेश मंडळ पदाधिकारी, शांतता समिती सदस्य, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन मार्गदर्शन करून नियोजन करण्यात येत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT