Officials of Marathi Vadmay Mandal present on the occasion of building the auditorium. esakal
जळगाव

Amalner Marathi Sahitya Sammelan : मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर येथे होत असलेले ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Amalner Marathi Sahitya Sammelan : साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर येथे होत असलेले ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. संमेलनस्थळी तीन सभागृह उभारण्यात आली आहेत.

सभामंडप क्रमांक एकला खानदेशकन्या बहिणाबाई चौधरी सभागृह, सभामंडप क्रमांक दोनला कविवर्य ना. धों. महानोर सभागृह, तर सभामंडप तीनला बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृह असे नाव देण्यात आले आहे. (Preparations for Marathi Sahitya Sammelan are in final stage jalgaon news)

सभामंडप क्रमांक एक हे 'जर्मन हँगर' पद्धतीचे भव्य असे सभामंडप असून, त्यात सुमारे १० हजार लोकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. संमेलनाचा उत्साह संपूर्ण अमळनेर शहरात दिसून येत आहे. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहराचा कायापालट करण्यात येत आहे.

प्रताप महाविद्यालय परिसरातही रंगरंगोटी, सुशोभिकरणासह जय्यत तयारी सुरू आहे. मंडप उभारणी, प्रवेशद्वारासह इतर कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर सुमारे सात ते दहा हजार प्रेक्षक बसतील, अशा ‘जर्मन हँगर’ पद्धतीचा भव्य असा सभामंडप उभारण्यात येत आहे.

यामध्ये सुमारे १५० बाय ३२५ फूट अशा भव्य मंडप उभारण्याच्या कामाला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे.

संमेलनस्थळी प्रवेश करण्यासाठी महाविद्यालयासमोर भव्य व आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज, संत सखाराम महाराज, पूज्य साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी, श्रीमंत प्रताप शेटजी यांच्या प्रतिमा आहेत.

याशिवाय संपूर्ण महाविद्यालय परिसरातील भिंतींवर आकर्षक चित्रे काढण्यात आली आहे. पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीत उभारण्यात आलेल्या सभामंडप क्रमांक एक खानदेशकन्या बहिणाबाई चौधरी सभागृहात ७ ते १० हजार लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या मंडपात ८० बाय ५० फुटांचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे.

त्याची जमिनीपासूनची उंची ६ फूट आहे. हे सभामंडप जर्मन हँगर पद्धतीने उभारण्यात आले आहे. हे संपूर्ण सभामंडप वॉटरप्रूफ आहे. विशेष बाब म्हणजे, इतक्या मोठ्या मंडपात एकही खांब नाही.

प्रकाशन कट्टा अन् सेल्फी पॉइंट

सभामंडप क्रमांक दोन कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात अंदाजे ५०० जणांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. तर सभामंडप क्रमांक तीन बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहातही अंदाजे ५०० जणांची बैठक व्यवस्था असेल.

हे सभामंडप प्रताप महाविद्यालयातील जुन्या नाट्यगृहात आहे. बी. फार्मसी महाविद्यालयाजवळ ३०० ग्रंथदालने उभारण्यात आली आहेत. यात खवय्यांसाठी काही दालने राखीव ठेवण्यात आली आहे. याच परिसरात प्रकाशन कट्टा व सेल्फी पॉइंट देखील उभारण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT