Vinod Pandharinath Mahajan (President), Vinod Shankar Jadhav (Principal) and Narendra Uttam Wagh (Clerk)  esakal
जळगाव

Jalgaon Bribe Crime : मुख्याध्यापकाने सोडली लाज; थेट चेकने घेतली लाच

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Bribe Crime : एरंडोलच्या एका शिक्षण संस्थेतून दुसऱ्या शिक्षण संस्थेत होणारी बदली थांबविण्यासाठी दोन शिक्षकांकडून चक्क धनादेशाने ७५ हजारांची लाच मागून अ‍ॅडव्हान्समध्ये धनादेश स्वीकारणाऱ्या संस्थाध्यक्षासह मुख्याध्यापक, वरिष्ठ लिपिकाला अटक करण्यात आली आहे. (principal took bribe by check jalgaon bribe crime news)

तक्रारदार शिक्षक हे श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचालित महात्मा फुले हायस्कूल, एरंडोल येथे उपशिक्षक पदावर कार्यरत आहेत. या संस्थेने तक्रारदारांची व त्यांचे उपशिक्षक या पदावर कार्यरत मित्र अशा दोघा शिक्षकांची बदली १ एप्रिलला एरंडोल हायस्कूल येथून महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव येथे केली.

त्याबाबतच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. तक्रारदार यांची व त्यांचे सहकारी उपशिक्षक मित्र अशा दोघांची बदलीस स्थगिती मिळण्यासाठी व पाठवलेला मंजुरी प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अशा आशयाचे संस्थेचे पत्र शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद जळगाव यांचे नावे देण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापक विनोद शंकर जाधव (वय ४२) व लिपिक नरेंद्र उत्तम वाघ (वय ४४, रा. भडगाव) यांनी लाचेची मागणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

संस्थाध्यक्षाला हवा होता पगार

मुख्याध्यापक व लिपिकानंतर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष विनोद पंढरीनाथ महाजन (वय ५६, रा. माळीवाडा, एरंडोल) यांच्यासाठी दोघा तक्रारदार शिक्षकांचा एक महिन्याचा पूर्ण पगार (प्रत्येकी ७५ हजार रुपये) हवा होता. तशी मागणीच बदली रद्द करण्यासाठी मुख्याध्यापक व लिपिकाने केली होती. त्यामुळे दोघा शिक्षकांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क केला.

त्यानुसार सापळा रचत अटक करण्यात आली. लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्यासह पथकातील निरीक्षक एन. एन. जाधव, सुनील पाटील, रवींद्र घुगे, ईश्वर धनगर, सचिन चाटे अशांच्या पथकाने वेशांतर करत सापळा रचला. लाचेपोटी धनादेश स्वीकारताच मुख्याध्यापक विनोद शंकर जाधव, वरिष्ठ लिपिक नरेंद्र उत्तम वाघ याच्यासह संस्थेचे अध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन या तिघांना अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT