prisoner escaped from the jail esakal
जळगाव

तो वेडा आहे सांगणाऱ्या पोलिसांनाच बनवले ‘मामू’; कैद्याने काढला पळ

भुसावळ कारागृहातून जिल्हा कारागृहात आणलेल्या कैद्याने जेलगेटवरच पोलिसाच्या हाताला झटका देत पळ काढल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : भुसावळ कारागृहातून जिल्हा कारागृहात आणलेल्या कैद्याने जेलगेटवरच पोलिसाच्या हाताला झटका देत पळ काढल्याची घटना घडली. या कैद्याला घेउन आलेल्या पोलिस पार्टीचे प्रमुख कारागृह अधीक्षकांना कागदपत्रे सादर करून तो वेडा असल्याचे सांगत असतानाच या कैद्याने पळ काढत पोलिसांनाच वेड्यात काढल्याची चर्चा होती.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकेत असलेला लोणी बुद्रूक (ता. रिसोड, जि. वाशिम) येथील न्यायबंदी महेश शिवदास दिक्षे (वय ३०) याची वैद्यकीय तपासणी करुन गुरुवारी (ता. १९) भुसावळ येथून जळगाव जिल्हा कारागृहात स्थलांतर (ट्रान्स्फर) करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भुसावळ पोलिस ठाण्याचे ईश्वर भालेराव, अमीत तडवी अशांनी महेश दिक्षे याला शासकीय वाहनाने जिल्हा कारागृहात दुपारी १२ वाजता आणले होते.

पोलिस नाईक अमित तडवी कैदी महेश दिक्षे याला पकडून ठेवत जेलगेटवर उभे असताना त्यांच्या हाताला झटका देत दिक्षे याने सबजेल पोलिस लाईनच्या गल्लीतून सुसाट वेगात पळ काढला.

अखेर गुन्हा दाखल

जेलगेटवरुन पोलिसांच्या हाताला झटका देत पळून जाण्यात कैदी यशस्वी ठरल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांसह कारागृह पोलिसांनी तब्बल चार ते पाच तास कैद्याचा शोध घेतला मात्र, संध्याकाळपर्यंत तो मिळून न आल्याने अखेर पोलिस कर्मचारी अमित तडवी यांच्या तक्रारीवरून जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात महेश शिवदास दिक्षे याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: ५ विकेट्स अन् अफलातून डायरेक्ट थ्रो... Deepti Sharma नं पाकिस्तानला फक्त रडवलंच नाही, तर विश्वविक्रमही केला

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT