Crime Update esakal
जळगाव

Crime Update : न्यायालयाने जामीन फेटाळल्याने कैद्याने गिळला खिळा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : न्यायालयाने जामीन फेटाळून लावल्याने कारागृहातील बंदिवान तरुणाने भिंतीवर असलेला खिळा काढून तो गिळत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. चेतन पितांबर सोनार असे बंदिवान याचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंदिवान चेतन सोनार याच्या विरुद्ध (भादंवि ३५४, ३७६, पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. २४ ऑगस्ट २०२० पासून तो न्यायालयाच्या आदेशाने कारागृहातच आहे. गुरुवारी (ता. ३) सकाळी त्याने कारागृहातील सात नंबर बॅरेक शेजारील भिंतीवरील खिळा त्याने उपटून काढला. (Prisoner swallows nail after court rejects bail Jalgaon Crime News)

नंतर आत्महत्येच्या उद्देशाने तो खिळा गिळल्याचा प्रकार घडल्याने कारागृहात एकच धावपळ उडाली. कारागृह शिपाई अरविंद म्हस्के यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी तत्काळ तुरुंग अधिकारी संतोष पवार यांना सदरचा प्रकार सांगितला.

न्यायालयाने जामीन नामंजूर केला म्हणून खिळा गिळून घेतल्याचे सांगितले. त्यानंतर तत्काळ बंदिवान याला जिल्हा कारागृहात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी एक्स-रे काढल्यावर चेतन सोनार याने खिळा गिळल्याचे आढळून झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लोकलचा जम्बो ब्लॉक! 'या' लोकल रद्द, मेल, एक्स्प्रेस सेवांवरही परिणाम; कधी आणि कुठे? वेळापत्रक पहाच

मालदीवमध्ये स्पीडबोट समुद्रात उलटली; उद्योगपती गौतम सिंघानिया जखमी; ५ जण बेपत्ता

Panchang 21 March 2026: शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण आणि ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

Sports News: पुणे, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे माहेरघर: मागील १२ वर्षांत आठ वेळा यजमानपद

सातारा झेडपीवर प्रथमच भाजपाचा झेंडा, मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंची खेळी

SCROLL FOR NEXT