Panchnama of damage to banana crop complete esakal
जळगाव

Jalgaon : पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने 58 कोटींचा प्रस्ताव सादर ; पंचनामे पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कुकुंबर मोझियाक व्हायरस अर्थात सीएमव्ही रोगामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादकांना धडकी भरली असून, यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने या रोगामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, लवकरच या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी ५८ कोटी रुपयांच्या तरतुदीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, केळी उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.(Proposal of 58 crore submitted follow up Guardian Minister Punchnama complete Jalgaon News)

जिल्ह्यातील प्रमुख पीक असणाऱ्या केळीवर सध्या कुकुंबर मोझियाक व्हायरस अर्थात सीएमव्ही या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. हा रोग झाल्यानंतर संपूर्ण शेतातील पीकच काढून फेकावे लागते. हा रोग संसर्गजन्स असून, केळी उत्पादक धास्तावले आहेत. मुख्यमंत्री शिंदे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना २० सप्टेंबरला पालकमंत्री पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्याकडे केळी उत्पादकांची व्यथा मांडली होती.

तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सीएमव्हीग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही दिली होती. या अनुषंगाने २१ सप्टेंबरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सीएमव्हीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ११ रुपये प्रतिरोप या सवलतीच्या दरात टिश्युकल्चर रोपे उपलब्ध करण्यात येतील, असा निर्णयदेखील घेण्यात आला होता.

देय अनुदान

दरम्यान, यानंतर करण्यात आलेल्या पाहणीत जिल्ह्यातील २७५ गावांमधील १५ हजार ६६३ शेतकऱ्यांना सीएमव्ही रोगाचा फटका बसल्याचे दिसून आले. यामुळे एकूण आठ हजार ७७१ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे. यात एकूण ११ रुपये प्रतिरोप या मूल्यानुसार तीन कोटी ८९ लाख ७७ हजार ६५७ रोपांचे एकूण ४२ कोटी ८९ लाख ५४ हजार २३१ रुपये इतके अनुदान देय आहे, तर १५ रुपयांच्या सरासरी दरानुसार याचे मूल्य ५८ कोटी ४६ लाख ६४ हजार ८५५ रुपये इतके अनुदान देय आहे. या संदर्भातील प्रस्ताव पालकमंत्री पाटील यांच्या निर्देशानुसार शासनाकडे पाठविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT