Sakal Maratha Samaj Bandhav giving a statement at the one-day hunger strike to support Jarange Patil's hunger strike. esakal
जळगाव

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जिल्ह्यात ‘वज्रमूठ’; ठिकठिकाणी उपोषण

सकाळ वृत्तसेवा

Maratha Reservation : मनोज जरांगे-पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे मंगळवारपासून (ता. ३१) येथील जिल्ह्यात ठिकठिकाणी बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, उपोषणाला पाठिंबा म्हणून आज पाचोऱ्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.

तर जरांगे-पाटील यांची खालावलेली तब्येत लवकर बरी व्हावी, यासाठी मुक्ताईनगरला महामृत्युंजय यज्ज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. भुसावळ, जामनेर येथेही एक दिवसीय उपोषण करण्यात आले.(protest at various places in district for reservation of Maratha community jalgaon news)

पाचोरा बंदला अभूतपूर्व प्रतिसाद

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसह मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आयोजित पाचोरा बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. व्यापारी व दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभागी होऊन मराठा समाजाच्या मागणीस पाठिंबा दर्शवला.

हुतात्मा स्मारकात झालेेल्या बैठकीत पाचोरा बंदचा निर्धार करण्यात आला होता. त्या आधारे मंगळवारी (ता.३१) कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा सेवा संघाचे सुनील पाटील, मुकेश तुपे, एस. के. पाटील, गणेश पाटील, जीभाऊ पाटील, विकास पाटील, राजेंद्र पाटील, धनराज पाटील, पप्पू राजपूत, किशोर बारवकर, रणजीत पाटील, नितीन तावडे यांच्यासह समाज सकल मराठा समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित येऊन आरक्षणाच्या मागणीबाबत घोषणा दिल्या.

छत्रपती शिवराय, मासाहेब जिजाऊ, छत्रपती राजे संभाजी यांचा जयघोष करत संपूर्ण शहरात फिरून बंदचे आवाहन केले. सकाळपासूनच व्यापारी व दुकानदारांनी उस्फूर्तपणे बंद पाळून मराठा समाजाच्या मागणीस पाठिंबा दर्शवला. शाळा व महाविद्यालयीन परीक्षा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले.

भुसावळला लाक्षणिक उपोषण

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने मंगळवारी (ता.३१) सकाळी दहाला एक तहसील कार्यालयासमोर दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

याप्रसंगी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांसह संभाजी सेनेचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, संजय कदम, ठाकूर समाजाचे अध्यक्ष सुनील ठाकूर, काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील, रवींद्र निकम, मुनव्वर खान, शेख अश्फाक शेख काझी, शेख सहीद, प्रवीणसिंह पाटील, तेली समाजाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब चौधरी, राजेंद्र चौधरी, पप्पू जकाददार, हिप्पी शेठ, पत्रकार महासंघाचे नवलसिंग राजपूत, रिंकू राजपूत, मुस्लिम सेवा संघ व महिला विभाग प्रदेश उपाध्यक्ष हमीदा गवळी, वंचित बहुजन संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, मोहन पाटील, बबन कांबळे, रुपेश साळुके, निलेश जाधव, शुभम कदम तर भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांनीही उपोषणाला पाठिंबा दिला.

..तर राजीनामा देणार : संजय सावकारे

उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आमदार संजय सावकार आले असता त्या ठिकाणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सावकार यांना राजीनामा विषयी विचारले असता जर सरकार वेळ काढूपणा करीत आहे, असे निदर्शनास आल्यास मी राजीनामा देण्यास तयार आहे, असे सांगितले. सायंकाळी साडेचारला प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे, मुक्ताईनगर तहसीलदार निकेतन वाळे यांनी उपोषणस्थळी येऊन निवेदन स्वीकारले.

मुक्ताईनगरला ‘महामृत्युंजय’

मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीकडे पाहता सरकारने तत्काळ मराठा आरक्षण जाहीर करून आंदोलन तत्काळ थांबबावे, अशी मागणी मराठा समाजातील तरुणांतर्फे करण्यात आली. तसेच त्यांची खालावलेली तब्येत लवकरात लवकर बरी होण्यासाठी महामृत्युंजय यज्ज्ञाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी किशोर गावंडे, जगदीश निकम, किरण महाजन, विकी मराठे, रवींद्र जाधव, सुनील पाटील, डॉ. विवेक सोनवणे, सोपान कळसकर, नीलेश पाटील, गुणवंत पाटील, किशोर घटे, मयूर पाटील, सचिन पाटील, चेतन पाटील, प्रदीप पाटील उपस्थित होते.

जामनेरला मराठा समाजातर्फे पाठिंबा

जरांगे-पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारपासून (ता. ३१) येथील तहसील कार्यालयासमोर तालुका सकल मराठा समाजातर्फे बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

साखळी आंदोलनास उपस्थित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, राहुल चव्हाण, अतुल सोनवणे, अशोक पाटील, प्रदीप गायके, अमोल ठोबरे, विश्वजित पाटील, प्रकाश पाटील, शंकर मराठे, डॉ. प्रशांत पाटील, प्रदीप पाटील, नरेंद्र जंजाळ, योगेश पाटील, प्रवीण गावंडे, राजू चोपडे आदींसह सर्वपक्षीय समाजसमाज बांधव, असंख्य नागरीक उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने संजय गरुड, दिगंबर पाटील, विलास राजपूत यांनी या साखळी उपोषणास जाहीर पाठिंबा दिला.

फत्तेपूरला साखळी उपोषण

मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाच्या समर्थनार्थ बसस्थानक परिसरात मराठा समाजातर्फे मंगळवारी सकाळी दहापासून साखळी उपोषणास सुरवात झाली. राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष व युवा कार्यकर्ते राहुल चौधरी यांच्या नेतृत्वात समाधान हुंबड, उमेश सोन्नी, संतोष इधाटे, राहुल चोपडे, आकाश गावंडे, शुभम काळे, शुभम शेळके, धनराज वाणी, गौरव जंजाळ, राहुल पाटील, कैलास चौधरी, योगेश चौधरी आदींनी सहभागी होऊन पाठिंबा दिला आहे.

रावेरला ३ नोव्हेंबरला मोर्चा

मराठा आरक्षणाला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे ३ नोव्हेंबरला शुक्रवारी तहसीलदार कार्यालयावर बैलगाडी ट्रॅक्टरसह मोर्चा काढण्याचा निर्णय आज घेण्यात आला. तालुक्यातील सकल मराठा समाजाची बैठक येथील बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज दुपारी झाली.

माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. बाजार समिती संचालक योगीराज पाटील, सभापती सचिन पाटील, माजी पंचायत समिती सदस्य दीपक पाटील आणि कार्यकर्ते घनश्याम पाटील, पवन पाटील यांनी मनोगत मांडले. यावेळी डॉ. राजेंद्र पाटील, गणेश महाजन, सुनील कोंडे, प्रमोद चौधरी, राजेंद्र चौधरी, वाय. व्ही. पाटील, पितांबर पाटील, मंदार पाटील, प्रकाश पाटील, योगेश पाटील, सोपान साहेबराव पाटील, जयेश कुयटे, सय्यद असगर, विनोद पाटील, प्रशांत पाटील, जिजाबराव पाटील आदींनी चर्चेत सहभाग घेतला. यानंतर मोर्चा काढणार असल्याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

मराठा आरक्षण व जरांगे पाटील यांच्या उपोषण या संदर्भात भूमिका मांडताना दिलीप वाघ. शेजारी संजय वाघ, रणजित पाटील, अजहर खान आदी.

उपोषणाची गांभीर्याने दखल घ्या : दिलीप वाघ

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दुसऱ्यांदा बेमुदत उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी व राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीवरून धूमसत असलेली परिस्थिती शांत करावी.

राष्ट्रवादी काँग्रेस मराठा आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असल्याची माहिती माजी आमदार दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संजय वाघ, खलील देशमुख, नितीन तावडे, रणजीत पाटील ,अजहर खान,भूषण वाघ आदि उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT