sand sakal
जळगाव

जळगाव : जिल्ह्यातील १४ वाळू लिलाव गटाची जनसुनावणी

पर्यावरण समितीकडे अहवाल सादर : तीन गटांचे लिलाव

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात भडगाव, पाचोरा, चोपडा येथील तीन वाळू गटांचे लिलाव झाले आहेत. १४ वाळू गटांची जनसुनावणी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण विभागाने घेतली. वाळू गटांबाबत राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे प्रदूषण नियंत्रण विभाग अहवाल सादर करणार आहे. राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या बैठकीत या गटांना मंजुरी मिळेल, अशी माहिती जिल्हा गौण खनिज विभागाच्या सूत्रांनी दिली.

आव्हाणेचा यंदा ठेका नाही

आव्हाणे येथे वाळूचा अवैधरीत्या उपसा होतो. तरीही तेथील ग्रामपंचायतीने वाळू उपसाबाबत ठराव केलेला नाही. यामुळे आता या ठिकाणची वाळू चोरी झाल्यास त्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर येणार आहे. जी गावे वाळू उपसाबाबत ठराव करणार नाहीत, अशा गावातील वाळूच्या उपशास गावच जबाबदार राहील, असा अध्यादेश शासनाने काढलेला आहे. त्यानुसार ही कारवाई होणार आहे.

या गटांचे होतील लिलाव

मुक्ताईनगर तालुक्यात दोन गट, रावेर सहा गट, जळगावचे दोन गट, धरणगावमधील बाभूळगाव एक व दोन, अमळनेर येथील दोन गटांचे लिलाव होणार आहेत. सोबतच टाकरखेडा येथील वाळू गटाचा लिलाव होणार आहे.

अवैध वाळू उपशावर नियंत्रण नाहीच

गिरणा नदीपात्रातील वाळू ठेके बंद असले, तरी मध्यरात्रीनंतर वाळूउपसा सुरूच आहे. शहरात अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. तेथे पाहणी केली असता मध्यरात्रीनंतर बांधकामाजवळ वाळू टाकलेली दिसते. महसूल, पोलिसांना चकवा देत वाळूमाफिया वाळूचा अवैध उपसा करतात.

वाळू गटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू आहे. पर्यावरण समितीची मंजुरी मिळताच लिलाव होतील. अवैध वाळूउपशावर नियंत्रणासाठी महसूल यंत्रणा कार्यरत आहे. अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

- दीपक चव्हाण, जिल्हा गौण खनिज अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT