Punter arrested along with bribe taking constable from Amalner jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Bribe Crime : अमळनेर येथील लाचखोर हवालदारासह पंटरला अटक

व्यावसायिकाचा डंपर अडवून ३० हजारांची लाच मागून ती खासगी पंटरच्या माध्यमातून स्वीकारताना येथील पोलिस ठाण्यातील हवालदारासह खासगी पंटरला धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Bribe Crime : बांधकाम मटेरियलची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकाचा डंपर अडवून ३० हजारांची लाच मागून ती खासगी पंटरच्या माध्यमातून स्वीकारताना येथील पोलिस ठाण्यातील हवालदारासह खासगी पंटरला धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

हवालदार घनश्याम अशोक पवार व खासगी पंटर इम्रानखान शब्बीरखान पठाण असे अटकेतील लाचखोरांची नावे आहेत. (Punter arrested along with bribe taking constable from Amalner jalgaon crime news)

तक्रारदार हे अमळनेर शहरातील रहिवासी असून त्यांचा बांधकाम मटेरियलचा व्यवसाय आहे. येथील हवालदार घनश्याम पवार यांनी ७ जानेवारीला तक्रारदाराचा डंपर अडवत त्यांच्याकडे पोलिस निरीक्षक विजय शिंदे व स्वतःसाठी दरमहा हप्ता म्हणून ३० हजारांची लाच मागितली होती.

याबाबतची तक्रार तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दूरध्वनीवरून केली. त्यानुसार, लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. ९) लाचेबाबत पडताळणी केल्यानंतर हवालदार पवार यांनी ३० हजारांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने सापळा रचला.

खासगी पंटर इम्रान खान याच्याकडे लाचेची रक्कम देण्याचे घनश्याम पवार यांना सांगितल्यानंतर सुरवातीला त्याला व नंतर हवालदार घनश्याम पवार यांना पथकाने अटक केली.

यांनी केली यशस्वी कारवाई

ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलिस निरीक्षक रूपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागूल, मकरंद पाटील, रामदास बारेला, संतोष पावरा, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT