Raid on nylon manja seller 5 thousand fine in Jalgaon News psl98 sakal
जळगाव

Jalgaon News : नायलॉन मांजा विक्रेत्यावर धाड; 5 हजाराचा दंड

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर महानगरपालिकेच्या पथकाने मंगळवारी (ता.९) विविध भागात धाडसत्र राबविले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : नायलॉन मांजा विक्रेत्यांवर महानगरपालिकेच्या पथकाने मंगळवारी (ता.९) विविध भागात धाडसत्र राबविले. ख्याँजामिया दर्ग्याजवळ रस्त्यावर मांजा जप्त करण्यात आला. (Raid on nylon manja seller 5 thousand fine in Jalgaon News)

संबंधितास जागेवरच पाच हजाराचा दंड आकारण्यात आला. मकरसंक्रात सणानिमित्ताने पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर होतो. गेल्या आठवड्यात शुक्रवारी दूर्वा बापू माळी (वय ११, रा.पिंप्राळा) ही बालिका मांजामुळेच जखमी झाली.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे सहायक आयुक्त उदय पाटील यांनी मुख्य स्वच्छता निरीक्षक उल्हास इंगळे, जितेंद्र किरंगे, नागेश्वर लोखंडे, रमेश कांबळे, आरोग्य निरीक्षक ललित बऱ्हाटे, धीरज गोडाले, विशाल वानखेडे.

मुकादम भरत ढंढोरे, चेतन जावळे व इम्रान भिस्ती यांचे पथक तयार केले. या पथकाने जोशी पेठेतील पतंग गल्लीत नऊ विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी केली असता एकाही जणाकडे मांजा आढळून आला नाही.

एका दुकानाची तपासणी होत असतानाच अन्य विक्रेते सावध झाल्याची चर्चा आहे. ख्याँजामिया दर्ग्याजवळ मात्र एका जणाजवळ एक किलो मांजा आढळून आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

'एकाने रक्ताने पत्र लिहून भेटायला आला अन्...' रेणूका शहाणे यांनी सांगितला चाहत्याचा किस्सा, म्हणाल्या...‘हम आपके हैं कौन सिनेमानंतर.’

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा, प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : सचिन वाझेच्या जामिनाला स्थगिती; NIAची मुंबई उच्च न्यायालयात धाव

SCROLL FOR NEXT