राज ठाकरे Sakal
जळगाव

जळगावच्या खटल्यात राज ठाकरेंसह चौघे निर्दोष

२००८ मध्ये मोर्चा काढून पुकारला होता बंद

सकाळ ऑनलाईन टीम

जळगाव : उत्तर भारतीयांवरील हल्ल्याप्रकरणी २००८ मध्ये राज ठाकरेंना अटक झाल्यानंतर जळगावात त्याचे पडसाद उमटताना बंद पुकारण्यात आला. या प्रकरणी जळगाव न्यायालयात दाखल खटल्यात राज ठाकरेंसह अन्य चौघांची आज (ता.११) निर्दोष मुक्तता करण्यात आली.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, मुंबई येथे रेल्वेत मराठी मुलांची भरती करण्याच्या मागणीसोबत उत्तर भारतीयांवरील हल्ल्याप्रकरणी सन २००८मध्ये राज ठाकरेंवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले. त्याविरोधात मनसेने राज्यभर आंदोलनही केले. मनसेतर्फे केलेल्या आंदोलनानंतर राज ठाकरेंना अटक करण्यात आली होती.

या अटकेच्या निषेधार्थ या अटकेचे पडसाद २१ ऑक्टोबर २००८ ला जळगावतही उमटले होते. जळगावात मनसे पदाधिकाऱ्‍यांनी मोर्चा काढून बंद पुकारला होता. या प्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंसह मनसेचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस ॲड. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, रज्जाक सय्यद, प्रेमानंद जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या चौघांना वॉरंट बजावल्यानंतर न्यायालयाने राज यांना १५ हजारांचा जामीन मंजूर केला होता. तसेच या खटल्याच्या कामात कायमची गैरहजर राहण्याची परवानगीही दिली होती. या खटल्याची सुनावणी शुक्रवारी (ता.११) झाली. जळगाव न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली. अॅड. संदीप पाटील यांनी मनसेच्या वतीने कामकाज बघितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2026

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

SCROLL FOR NEXT