A magnificent idol of Lord Sri Rama.
A magnificent idol of Lord Sri Rama.  esakal
जळगाव

Ram Navami 2023 : मजला अनाथा प्रभु तूचि दाता.. मी मूढ की जाण असेची आता| श्रीराम जन्मोत्सवात भक्त चिंब!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव यंदा भाविकांनी दणक्यात साजरा केला. कोरोनामुळे दोन वर्षांपासून श्रीराम नवमी उत्सव सार्वजनिकरित्या साजरा झाला नव्हता. तो यंदा रामनामाच्या जयघोषात, अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. (ram navami 2023 celebrated with great enthusiasm in jalgaon)

श्रीराम नवमीनिमित्त शहरातून गुरुवारी निघालेल्या शोभायात्रेत लेझीम खेळताना विद्यार्थी. प्रात्याक्षिक दाखविताना युवक.

लेझीम आणि अन्य प्रात्यक्षिके सादर करणारी, भगव्या ध्वजांनी परिपूर्ण शोभायात्रा यंदाच्या उत्सवाचे आकर्षण ठरली.

श्रीराम नवमीनिमित्त शहरातील मंदिरांमध्ये गुरुवारी (ता. ३०) सकाळपासूनच विविध कार्यक्रम झाले. यंदा भाविकांना घरोघरी जन्मोत्सव साजरा करण्याबाबत विश्‍व हिंदू परिषदेस अन्य हिंदुत्त्ववादी संघटनांनी आवाहन केले होते. यंदाच्या उत्सवात शोभायात्रेचेही नियोजन होते.

अभिषेक, पूजन, उत्सव

जळगाव नगरीचे ग्रामदैवत असलेल्या जुन्या जळगावातील श्रीराम मंदिर संस्थानात गुरुवारी पहाटेपासून श्रीराम जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम झाले. पहाटे अभिषेक, पूजन, दुपारी बाराच्या सुमारास जन्मोत्सव, सायंकाळी भजन व कीर्तन, असे कार्यक्रम झाले. पहाटेपासूनच मंदिरात प्रभुंच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभरात हजारो भाविकांनी या ग्रामदैवताचे दर्शन घेतले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

बसस्थानकासमोरील चिमुकले राम मंदिरातही सकाळपासून भाविकांची गर्दी झाली होती. पहाटेपासून उत्सव मूर्तीवर अभिषेक, पूजन, असे कार्यक्रम झाले.

दुपारी अनेक भक्तांच्या साक्षीने, प्रचंड जयघोषात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांच्या हस्ते आरती झाली. मंदिरातील पुजारी दादा महाराज जोशी यांनी भक्तांना रामकथा सांगितली.

शोभायात्रेने शहरात चैतन्य

यंदा प्रथमच राम जन्मोत्सवानिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दुपारी साडेचारला गोलाणी व्यापारी संकुलालगतच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरापासून शोभायात्रा निघाली. यात्रेत कुर्ता- पायजमा घातलेले तरुण, लहान मुले-मुली, लेझीम पथक, मध्यभागी सजविलेल्या बग्गीवर रामाची भव्य मूर्ती विराजमान होती.

शोभायात्रेत राम-सीतेची साकारलेली सजीव आरास.

‘रामजी की निकली सवारी..’च्या गाण्यावर नाचत भक्तांनी शोभायात्रेत सहभाग घेतला. सर्व प्रमुख मार्गांवरून शोभायात्रेचे फुल-पाकळ्यांसह, फटाक्यांच्या आतिषबाजीने ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांसह डीजेचाही गजर जोडीला होताच. तरुणांनी विविध चित्तथरारक प्रात्यक्षिकेही सादर केली. रात्री नऊपर्यंत शोभायात्रा सुरू होती. नंतर यात्रेचा समारोप होऊन प्रभूंची महाआरती मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.

घरांवर भगवा ध्वज

विश्व हिंदू परिषदेने यंदा नागरिकांना रामनवमी साजरी करण्याबाबत आवाहन केले होते. त्यानुसार शहरातील अनेक घरांवर राम जन्मोत्सवानिमित्त भगवा ध्वज लावण्यात आला होता. सायंकाळी नागरिकांनी घरासमोर सडा-रांगोळी घालत उत्सव साजरा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट व्हाट्सअप अकाऊंट; नागरिकांकडे पैशांची मागणी

आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? जलवाहिन्या टाकल्या परंतु पाण्यावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT