Dates for sale in the market on the occasion of 'Ramadan'.  esakal
जळगाव

Ramdan 2023 : रमजान सुरू होताच खजुरांची मागणी वाढली; किमतीत 10 ते 15 टक्क्यांनी वाढ!

सकाळ वृत्तसेवा

वावडे (जि. जळगाव) : इस्लामी कालगणनेतील रमजान महिन्याला २४ मार्चला सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने सुरुवात झाली आहे. शुक्रवारी मुस्लिम बांधवांचा पहिला रोजा पार पडला.

रमजानचा रोजा सोडताना खजूर खाण्याची प्रथा असल्याने, रमजान महिन्यात खजुरांच्या विक्रीत वाढ होते. यंदा रमजान सुरू होताच खजुरांची मागणी वाढली आहे. (ramdan started price of dates increased by 10 to 15 percent jalgaon news)

बाजारामध्ये पूर्वेच्या देशांमधून येणाऱ्या खजुराला जास्त मागणी आहे. ट्युनिशिया येथील खजूर २०० ते २,५०० रुपये, तर इराणमधील ब्लॅक लिली खजूर २४० ते २५० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. सौदी अरेबिया येथील नावर जुमेरा खजुरासाठी किलोमागे २४० रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय इराकमधील जाएदी खजुरालाही चांगली मागणी आहे. अजवा खजुराची किंमत सध्या १,००० ते १,५०० रुपये किलो आहे. तीदेखील १० ते १५ टक्क्यांनी वाढली आहे.

या शिवाय कलमी, ओमानी, मस्कती खजूर असे पर्याय उपलब्ध आहेत. खजुरांच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. किमिया या खजुराला मोठी मागणी असून, त्याचा दर ६०० ग्रॅमसाठी १२० ते १३० रुपयांवरून १५० रुपयांवर गेला आहे. ७० रुपये किलो दराने मिळणाऱ्या साध्या खजुराची किंमत ही ९० रुपयांपेक्षा पुढे गेली आहे. विविध दुकानात खजूर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

दरम्यान, गुरूवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर रात्री साडेआठनंतर विशेष तरावीहची नमाज प्रत्येक मशिदीमध्ये अदा करण्यास सुरुवात करण्यात आली. ती काही ठिकाणी दहा दिवस तर काही ठिकाणी तीस दिवस रोज रात्री चालणार आहे. व्यापारी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी काही ठिकाणी दहा दिवसांच्या तरावीह नमाजचे आयोजन करण्यात आले होते.

सलग चौथ्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये रोजे

पवित्र रमजान महिना उन्हाळ्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात येण्याचे यंदाचे चौथे वर्षे आहे. या अगोदर २०२० मध्ये २५ एप्रिल, २०२१ ला १४ एप्रिल, तर २०२२ ला ३ एप्रिलला रमजान पर्व सुरू झाले होते. यंदा २३ मार्चपासून रमजान सुरू झाले असले तरी चार आठवडे रमजान एप्रिल महिन्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी

SCROLL FOR NEXT