New Born Baby esakal
जळगाव

Jalgaon News : नवजात शिशुवर दुर्मिळ पेटंट युरॅकसची शस्त्रक्रिया यशस्वी!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जन्मत:च शिशुच्या बेंबीतून पोटातील आतडे आणि मुत्राशयाची पिशवी बाहेर आल्याने शिशुच्या (newborn) जीवाला धोका निर्माण झाला होता. (rare patent urachus surgery on newborn was successful by doctor jalgaon news)

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ज्ञांनी या नवजात शिशुवर अत्यंत दुर्मिळ असलेली पेटंट युरॅकसची शस्त्रक्रिया यशस्वी केली.

गेल्या आठवड्यात भुसावळ येथील महिलेने गोंडस शिशुला जन्म दिला. नवजात शिशुच्या नाभिकेतून पोटातील आतडे आणि मुत्राशयाची पिशवी बाहेर आली होती. ही परिस्थिती लक्षात घेता बाल शल्यचिकित्सक डॉ. मिलिंद जोशी यांनी शिशुची तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात तब्बल दीड तास नवजात बाल शल्यचिकित्सक डॉ. मिलिंद जोशी आणि निवासी डॉ. श्रीयश सोनवणे यांनी शिशुवर पेटंट युरॅकस ही दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी केली.

या शस्त्रक्रियेदरम्यान नवजात शिशुच्या नाभिकेतून बाहेर आलेले आतडे आणि मुत्राशयाची पिशवी सुयोग्य आत टाकण्यात आली. त्यानंतर नवजात शिशुच्या नाभिकेची पुर्नरचना केल्याने शस्त्रक्रिया यशस्वी ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack Video: पत्नीवर पिटबुलचा हल्ला, वाचवायला गेलेल्या पतीलाही चावा; दीड मिनिटात २६ वेळा चावले, हातासह पायावर सर्जरीची वेळ

Dagdusheth Ganpati Temple: ‘दगडूशेठ गणपती ट्रस्ट’ला फरासखाना ठाण्याची जागा मिळणार, पुणे पोलिसांकडून गृह विभागाकडे प्रस्ताव सादर

Google Pixel 11 Series Launch: गुगलचे ४ नवे फोन भारतात लाँच! खरेदीवर १० हजार कॅशबॅक; पाहा किमती, फीचर्स अन् ऑफर्स...

Shravan Calendar 2026: कॅलेंडर कशाला उघडताय? श्रावणातल्या सगळ्या सणांची यादी इथेच वाचा

Latest Marathi News Live Update : २०१८ च्या भागामध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही - सरन्यायाधीश

SCROLL FOR NEXT