Santosh Chaudhary, Sharad Pawar
Santosh Chaudhary, Sharad Pawar  esakal
जळगाव

Raver Lok Sabha Constituency : रावेरला राष्ट्रवादीच्या गटासमोर संतोष चौधरींच्या बंडाचे आव्हान!

कैलास शिंदे

Jalgaon News : रावेर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीतील जागा शरद पवार गटाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल असे वाटत असतांना पक्षाचे माजी आमदार संतोष चव्हाण यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. त्यामुळे त्यांचे बंड कसे शमवायचे हे पक्षाच्या नेतृत्वापुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. रावेर लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडीतील शरद पवार गटाकडे आला आहे. (Raver Lok Sabha Constituency)

निवडणूकीची चाहूल लागल्यापासून या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला वादाची किनार लाभली आहे. प्रारंभी पक्षाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी या मतदारसंघातून आपण उमेदवारी करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे पवार गटाकडून एकनाथ खडसे लढणार असल्याबाबतच्या चर्चा राज्यभर सुरू झाल्या.

या मतदारसंघात त्यांच्या सून रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. त्यामुळे सासरा विरूध्द सून अशी लढत होणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. मात्र अचानकपणे तब्येतीच्या कारणामुळे खडसे यांनी रणांगणातून माघार घेतली, त्यानंतर त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. परंतु ॲड. रोहिणी खडसे यांनी आपण विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट करून लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला.

त्यानंतर पुढे एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात जाण्याची घोषणा केली मात्र त्याचवेळी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मात्र आपण पक्ष सोडणार नाही, पक्षात राहूनच कार्य करणार आहोत अशी घोषणा केली. एकीकडे या मतदार संघातील नेतेच पक्ष सोडून जात आहेत, तर दुसरीकडे पक्षासाठी उमेदवाराचा शोध घ्यावा लागत आहे. रावेर लोकसभा मतदार संघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. अगोदर हा मतदार संघ कॉंग्रेसकडे होता.

त्यानंतर दोन वेळा राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही या मतदारसंघात आपले उमेदवार उतरवून पाहिले परंतु पक्षाला यश आले नाही. आता ही जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आली असल्याने भाजपचा किल्ला भेदण्यासाठी तेवढाच सक्षम उमेदवार शोधण्याचे पक्षापुढे आव्हान निर्माण झाले होते. त्यावेळी अनेक नावे पुढे आली. (Latest Marathi News)

पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, मक्तेदार विनोद सोनवणे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. मात्र अचनाकपणे उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यांनी बारामती येथे जावून पक्षाचे नेते शरद पवार यांची भेटही घेतली. त्यानंतर पक्षांतर्गंत जिल्ह्यातील नेत्यांकडून उमेदवारीसाठी कल घेणे सुरू झाले.

यासाठी पुणे येथे पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठकही झाली. अखेर त्या बैठकीत उद्योजक श्रीराम पाटील यांचे नाव निश्‍चित करण्यात आले. मात्र श्रीराम पाटील हे भारतीय जनता पक्षात होते, त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटात पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश देण्यात आला. त्यानंतर पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या रावेर लोकसभा उमेदवारीची घोषणा केली.

उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर पक्षात सर्वकाही आलबेल होईल असा विश्‍वास नेतृत्वाला होता. परंतु पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटू लागला असल्याचे दिसून आले आहे. पक्षात काही जणांच्या मते ॲड. रवींद्र पाटील यांना उमेदवारी दिली असती तर पक्षाला फायदा झाला असता असे मत होते, ॲड.रवींद्र पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रीया व्यक्त न करता पक्षाच्या नेतृत्वाचा आदेश पाळून उमेदवारांचे काम सुरू केले.

परंतु माजी आमदार संतोष चौधरी यानी मात्र पक्षात उमेदवारीसाठी उघड बंड केले आहे. संतोष चौधरी यांनी आपल्याला उमेदवारी मिळण्याची अद्यापही अपेक्षा असल्याचे मत व्यक्त केले आहे. भुसावळ येथे त्यांनी नुकताच आपल्या समर्थकांचा मेळावाही घेतला व या ठिकाणी त्यांनी आपल्याला पक्ष उमेदवारी देईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मात्र जर पक्षाने उमेदवारी दिली नाही तरीही आपण उमेदवारी अर्ज दाखल करणारच आहोत अशी घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांनी पक्षात बंडाचा इशारा दिला आहे. त्यांच्या बंडामुळे पक्षापुढे मोठे आव्हान उभे राहणार नाही. माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाला मानणारा मोठ्या प्रमाणात वर्ग या मतदार संघात आहे.

त्यामुळे त्यांची बंडखोरी पक्षाला महागात पडण्याची शक्यता आहे. पक्षाचे नेते शरद पवार रविवार (ता.२१) रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहेत. रावेर लोकसभा मतदार संघात ते मेळावा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी ते माजी आमदार संतोष चौधरी यांची भेट घेवून चर्चा करण्याची शक्यता आहे.

शरद पवार कोणता तोडगा काढून चौधरी यांना बंड करण्यापासून दूर करणार हे मात्र त्यांच्या जळगाव भेटीनंतरच समजणार आहे. तोपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटासमोर बंडाचे मोठे आव्हान असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll 2024: दोन शिवसेनेच्या लढतीत AIMIM महाराष्ट्रातून हद्दपार? एक्झिट पोलने औवेसींना किती जागा दिल्या? 

Exit Polls चा खोटेपणा? दोन्ही शिवसेनेच्या आकडेवारीत मोठा घोळ तर पाच जागा लढवणारा पक्ष 6 जागांवर विजयी

गोफण | गांधी को किसका प्रेरणा था, मालूम है?

Raveena Tandon : कधी सवतीवर फेकलाय ज्यूस तर कधी मुलाला हाकललं सेटवरून ; या आधीही रवीनाने रागाच्या भरात केलाय तमाशा

Arunachal Pradesh and Sikkim election results 2024 Live: अरुणाचलमध्ये भाजप 23 जागांवर विजयी, 23 वर आघाडीवर; सिक्कीममध्ये एसकेएमने जिंकल्या 11 जागा

SCROLL FOR NEXT