Viral Video Sakal
जळगाव

'जेव्हा यमराज सुट्टीवर असतात'! शॉर्टकटने घरी जाण्यासाठी पुरात मारली उडी अन्...; थरारक घटना | Video Viral

या तरूणाने आपली आपबिती नंतर सांगितली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Jalgaon Flood News Update : सध्या राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी पुरामुळे नागरिक अडकले आहेत. काल यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्ह्यातील अनेक नद्या, नाल्यांना पूर आला असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली होती.

सध्या जळगाव जिल्ह्यातील रावेत तालुक्यातील मांगी येथील एका तरूणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो शॉर्टकट मार्गाने घरी जाण्यासाठी थेट पुराच्या पाण्यात उडी मारत आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर पुढे तो घरी सुखरूप पोहोचतो असं सांगत आहे. तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी हा व्हिडिओ शूट केला असून हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, गणेश पुंडलिक कोडे असं या तरूणाचं नाव असून "मला शॉर्टकटने घरी जायचं होतं म्हणून मी या पाण्यात उडी मारली" असं तो सांगत आहे. पण पुराच्या पाण्यात स्टंट करणे अनेकदा आपल्या जीवावर बेतू शकते. तर पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. "यमराज सुट्टी वर होते वाटते, गणेश भाऊ तर शॉर्ट कट मारून घरी गेला, पण तुम्हीं काळजी घ्या रेल्वे यायच्या आत तिथून निघा नाहींतर तुम्हाला पण गणेश भाऊंच्या मागे जावं लागले, याला म्हणते काम" अशा मजेशीर कमेंट नेटकऱ्यांनी केल्या असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadevi Elephant Video: महादेवी हत्तीने चिमुकल्याला वाचवलं? व्हिडिओ होतोय व्हायरल... सत्य काय?

Friendship Day 2025: मित्राला कधीही 'हे' 5 गिफ्ट देऊ नका, मैत्रीच्या नात्यात येऊ शकतो दुरावा

Mahadevi Elephant Protest : एक दिवस ‘महादेवी’साठी, नांदणीतून मूक मोर्चा निघाला, कसा असेल रूट; जाणून घ्या वेळापत्रक

Happy Friendship Day 2025: राशीनुसार गिफ्ट्स देऊन मित्रांना द्या सरप्राइज , मैत्री आणखी करा घट्ट

Pune News : अरुण सरनाईक यांचा उलगडला रुपेरी प्रवास, ‘पप्पा सांगा कुणाचे’ पाहून डोळे पाणावले; वडिलांना वाहिली अनोखी आदरांजली

SCROLL FOR NEXT