farmers at market yard esakal
जळगाव

पारोळ्यात कैरी बाजाराला सुरवात; लोणच्यासाठी ‘सरदार’ला पसंती

सकाळ वृत्तसेवा

पारोळा (जि. जळगाव) : मागील आठवड्यापासून कृषी उत्पन्न बाजार समिती (Market Yard) आवारात कैरी (Raw Mango) बाजाराला सुरवात झाली. या रविवारी (ता. १२) काही तुरळक ग्राहकांनी कैरी विकत घेतली. बाजारात बारमासी, राजापुरी, करण, सरदार व गलगप्पा अशा जातीच्या कैरी आल्या आहेत. मात्र, ग्राहकांची लोणच्यासाठी (Pickle) सरदार कैरीला जास्त पसंती दिसून आली. (raw mango Market opens in Parola Jalgaon News)

मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या भयावह परिस्थितीमुळे कैरी बाजार बऱ्याच वेळा अमळनेर रस्त्यावर, भोकरबारी शिवारात किंबहुना ज्या ठिकाणी ग्राहक असतील अशा ठिकाणी भरविला जात होता. आता परिस्थिती सुधारली असून शासनाने सर्वत्र मोकळीकतेचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर यंदा कैरी बाजाराचा व्यवसाय चांगला होईल, या आशेने व्यावसायिकांनी मृग नक्षत्रातच कैरी विक्रीस सुरवात केली आहे. मात्र ग्राहकांअभावी व्यापाऱ्यांची कैरी पाहिजे तशी विकली जात नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. पाऊस पडल्यानंतरच कैरीचे लोणचे केले जाते. त्यामुळे येत्या काळात कैरीला अजून मागणी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आठवडे बाजारातील कैरीचे भाव (प्रतिकिलो)

बारामाशी ३० रुपये

राजापुरी ४० रुपये

गलगप्पा ४० रुपये

सरदार ५० रुपये

करण ५० रुपये

बाजारात मंदीचे सावट

कैरी बाजाराला सुरवात झाली असून लोणच्यासाठी लागणारा मालमसाला व इतर साहित्य यांचे दुकाने बाजार समितीच्या आवारात लागतात. मात्र पुरेसे ग्राहक नसल्याने या बाजारातही मंदीचे सावट आहे. यावेळी व्यापाऱ्यांशी संवाद साधला असता पावसाअभावी बाजारात मंदी असून यावर्षी चांगला व्यवसाय व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT