speaker esakal
जळगाव

Jalgaon News : अनधिकृत भोंगे हटवा अन्यथा हनुमान चालिसा लावणार; 5 दिवसांचा अल्टिमेटम

शहरातील धार्मिक स्थळावर विनापरवाना भोंगे बसविण्यात आले आहेत. त्यांचा आवाजही ५० डेसीबलपेक्षा अधिक असतो.

सकाळ वृत्तसेवा,

Jalgaon News : शहरातील धार्मिक स्थळावर विनापरवाना भोंगे बसविण्यात आले आहेत. त्यांचा आवाजही ५० डेसीबलपेक्षा अधिक असतो.

हे सरळसरळ न्यायालयाच्या आदेशाचे उल्लघंन असल्याने हे भोंगे त्वरीत उतरण्यात यावेत, पाच दिवसात उतरविले नाही, तर ज्या भागात भोंगे आहेत, तेथे हनुमान चालिसा लावण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. ()

मनसेतर्फे जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले असून, त्यात, धार्मिक स्थळावर लावण्यात आलेले विनापरवाना भोंगे हटविण्यासाठी पाच दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. धार्मिक स्थळांवरील पहाटे पाचला ते रात्री उशिरापर्यंत सुरू चालणाऱ्या कर्णकर्कश आवाजातील भोंग्यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होतो, त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

...तर हनुमान चालिसा

शहरातील धार्मिक स्थळावरील भोंग्याचा आवाज पाच दिवसात बंद करण्यात यावे, ते बंद न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्या-ज्या ठिकाणी भोंग्याचा आवाज सुरू असेल तेथे हनुमान चालिसा वाजविणार आहे. कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याची प्रशासनाची जबाबदारी असले. असाही इशारा मनसेचे महानगराध्यक्ष विनोद शिंदे, आशिष सपकाळे, राजेंद्र निकम ,श्रीकृष्ण मेंगळे, हरिओम सूर्यवंशी, गणेश नेरकर, योगेश पाटील, साजन पाटील आदींनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT