Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University esakal
जळगाव

KBCNMU News: ‘उमवि’चा 30 दिवसांच्या आत निकालाचा ‘पॅटर्न’; कॉपी प्रकरणे निम्म्यावर

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी परीक्षांचे बहुतांश निकाल तीस दिवसांच्या आत जाहीर होवू लागले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

KBCNMU News : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी परीक्षांचे बहुतांश निकाल तीस दिवसांच्या आत जाहीर होवू लागले आहेत. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्‍वरी यांनी मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना पत्र पाठवून केलेल्या आवाहनाला सर्व प्राध्यापकांनी चांगला प्रतिसाद देत मूल्यांकनात उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे या वेळी दिसून येत आहे.

राज्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे निकालाच्या बाबतीत कायम अग्रेसर राहिले आहे. दरवर्षी ३० ते ४५ दिवसांत निकाल लागतात. आता विद्यापीठात प्राध्यापकांना उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी येण्याची गरज उरले नाही. (Result Pattern of kbcnmu within 30 days jalgaon news)

विद्यापीठाने यावर्षी ऑनलाइन मूल्यांकनासाठी ७५ केंद्र स्थापन केले आहेत. वेळेच्या आत निकाल लागावेत यासाठी श्री. माहेश्‍वरी यांनी प्राध्यापकांना पत्र लिहिले होते. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील यांनी तीनही जिल्ह्यात परीक्षेच्या बाबतीत कार्यशाळा घेतल्या.

कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रयत्न

विद्यापीठाचे प्राधिकरण सदस्य व विद्यार्थी संघटनांसमवेत विद्यापीठातर्फे बैठकी घेऊन कॉपीमुक्त परीक्षेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी कॉपीच्या प्रमाणात घट झाली आहे. एप्रिल-मे २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेत ८६५ कॉपी प्रकरणे होती. आताच्या परीक्षेत ४२६ कॉपी प्रकरणे झाली आहेत.

विद्यापीठाने परीक्षांच्या मूल्यांकन कामात उत्तम कामगिरी करणाऱ्या समन्वयक आणि केंद्रप्रमुखांना प्रशस्तीप्रमाणपत्र देण्यास प्रांरभ केला आहे.

विद्यापीठाच्या प्रयत्नांना शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी उत्तम सहकार्य केल्यामुळे निकाल वेळेवर लागत आहेत. प्राध्यापकांनी मूल्यांकनाच्या कामात यावेळी चांगला प्रतिसाद दिला. परीक्षा विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी निकाल वेळेवर जाहीर व्हावेत, यासाठी प्रयत्न केले आहेत.

वेळेत निकाल जाहीर झालेले अभ्यासक्रम

विद्यापीठाच्या परीक्षा संपल्याच्या अंतिम तारखेपासून ३० दिवसांच्या आत बी.ए. (एमसीजे), एम.ए एम.सी.जे.,‍ बी. कॉम, बी.पी.ई., बी. एस्सी., बीएसडब्ल्यू, डीपीए, एमएमएस सीएम, एमएमएस सीएम (नवीन शैक्षणिक धोरणानुसार), एम.ए. मराठी, एम.ए हिंदी, एम.ए इंग्रजी, एम.एस्सी गणित, एम.एस्सी पर्यावरणशास्त्र, एम.एस्सी उपयोजित भू-विज्ञान, एम.एस्सी, एम.ए. भूगोल, एम.एस्सी संगणकशास्त्र, एम.एस्सी माहिती तंत्रज्ञान, एमबीए, एम.ए संरक्षणशास्त्र, एम.ए नाट्यशास्त्र, एम.ए संगीत, संगीत पदविका, एम.ल‍िब. या सर्व परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर झाले आहेत. अद्याप काही परीक्षा सुरू असून सर्व परीक्षांचे निकाल लवकर जाहीर होतील, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News:बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी : नाईक

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT