Dizziness  sakal
जळगाव

तीन कर्मचाऱ्यांना आंदोलनात भोवळ; शासकीय कार्यालयांत शुकशुकाट

आज विभागीय आयुक्तांशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना बराच कालावधी होऊनही त्याबाबत शासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे महसूल कर्मचाऱ्यांकडून सोमवार (ता. ४)पासून निदर्शने व घोषणाबाजी करीत बेमुदत बंद आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी आंदोलनात तीन महसूल कर्मचाऱ्यांना उन्हाच्या तीव्रतेने भोवळ आल्याची घटना घडली. उपस्थित कर्मचाऱ्यांना भोवळ आल्याने सावलीत नेले. नंतर घरी पाठविले.

दरम्यान, बुधवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मंत्रालयात आढावा घेतला. गुरुवारी (ता. ७) सर्व विभागीय आयुक्तांना आंदोलकांच्या मागण्यांबाबत चर्चा करून अहवाल मागविला आहे.

महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन मंजूर करणार आहे. मग विभागीय आयुक्तांशी चर्चा कशाला करायची, असा पवित्रा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. आयुक्तांकडे चर्चेला जायचे नाही. गेले तरी तुम्ही मागण्या मान्य करीत असाल तरच बोलणे करा, असे सांगत चर्चा करायची नाही. असे ठरविण्यात आले आहे.

आंदोलनात महसूल विभागातील लिपिक, अव्वल कारकून, शिपाई संवर्गातील कर्मचारी सहभागी झाल्याने शासकीय कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे. सर्वच शासकीय कामे ठप्प झाल्याने नागरिकांच्या फेऱ्या वाया जात आहेत. जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा चतुर्थ श्रेणी महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा महसूल वाहनचालक संघटना, जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे सर्व सदस्य, पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.

मे २०२१ अन्वये राज्यस्तरीय केलेला नायब तहसीलदार संवर्ग रद्द करावा. अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार पदोन्नतीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी, महसूल सहाय्यक (लिपिक) रिक्त पदांसाठी तत्काळ भरती प्रक्रिया राबवावी, अव्वल कारकून (वर्ग ३)च्या वेतन श्रेणीतील त्रुटी दूर करणे, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देणे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शैलेश परदेशी, कार्याध्यक्ष योगेश नन्नवरे, भाऊसाहेब नेटके, प्रवीण भिरूड, अतुल जोशी आदींनी संपात सहभाग घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ind-US ट्रे़ड डील फायनल होणार? डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर, परराष्ट्र मंत्र्यालयाने नेमकं काय सांगितलं?

Mumbai Local Megablock: महिन्याचा शेवटचा रविवार त्रासदायक! लोकल उशिराने धावणार; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : पोर्टलवर खताचा साठा भरपूर, पण तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी संकटात

ते इतके चांगले होते की पहिल्याच सीनला... सायलीच्या सासूबाईंनी सांगितला लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत काम करण्याचा अनुभव

हिंदू धर्म सोडून इस्लाम स्वीकारणारी व्यक्ती केवळ ‘मुस्लिम’ राहते, High Court ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT