Rickshaw Driver Elderly Couple Jalgaon esakal
जळगाव

Rickshaw Driver : रिक्षा चालकाचा असाही प्रामाणिकपणा! रिक्षात विसरलेली दागिने, पैसे असलेली बॅग दाम्पत्याला केली परत

रिक्षा चालकांनी अन्य रिक्षा चालकांना फोन करून माहिती घेण्यास सुरुवात केली.

सकाळ डिजिटल टीम

काही वेळानंतर एक बॅग नसल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी बॅगेची शोधाशोध करण्यास सुरुवात केली.

वाघोली : जळगावहून वाघोलीत आलेल्या वृद्ध दाम्पत्याची रिक्षात विसरलेली बॅग रिक्षा चालकाने (Rickshaw Driver) प्रामाणिकपणे त्या दाम्पत्याला परत सुपूर्द केली. त्या बॅगेत सोन्याचे दागिने व पैसे होते.

कृष्णा रामदास लोहार हे पत्नीसह जळगाव (Jalgaon) येथून एसटी महामंडळाच्या (ST Corporation) बसने वाघोलीत आले. त्यांना घेण्यासाठी त्यांचा नातू केसनंद फाटा येथे गेला. ते रिक्षाने घरी गेले. मात्र, त्यांनी आणलेली एक बॅग ते रिक्षातून काढण्यास विसरले. काही वेळानंतर एक बॅग नसल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी बॅगेची शोधाशोध करण्यास सुरुवात केली.

सोसायटीचे सीसी टीव्ही फुटेजही तपासले. मात्र, काहीच हाती आले नाही. अखेर नातू पुन्हा केसनंद फाट्यावरील रिक्षा स्टॅण्डवर गेला. रिक्षाचा नंबर नव्हता. त्याने तेथील अन्य रिक्षा चालकांना ही बाब सांगितली. रिक्षा चालकांनी अन्य रिक्षा चालकांना फोन करून माहिती घेण्यास सुरुवात केली.

आप्पासो रामचंद जाधव या रिक्षा चालकाला अन्य रिक्षा चालकाचा फोन आल्यानंतर त्याने आपण प्रवासी सोडण्यासाठी गेलो होतो व आपल्या रिक्षात बॅग असल्याचे सांगितले. तसेच ती बॅग नेऊन पुन्हा त्या दाम्पत्याला सुपूर्द केली. बॅग मिळाल्याने लोहार कुटुंब आनंदीत झाले. त्यांनी त्या रिक्षा चालकासह अन्य रिक्षा चालकांचेही आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT