दंगलीतील जखमी तरुण. Sakal
जळगाव

किरकोळ कारणावरून विरावलीत दंगल

परस्परविरोधी फिर्यादीत दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

यावल - तालुक्यातील विरावली येथे शेतातील किरकोळ कारणावरून दोन गटात दंगल झाली. यात परस्परविरोधी गटातील दहा जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तीन ते चार जण जखमी झाले आहेत. विरावली (ता. यावल) येथे रविवारी (ता. १७) दुपारी दोन गटात शेतातील किरकोळ कारणावरून दंगल घडली. त्यात लिलाबाई पाटील यांच्या फिर्यादीनुसार त्या शेतातील वाड्यात असताना गावातील किशोर निळे याने त्यांच्या चाऱ्याच्या कुट्टीवरून ट्रॅक्टर नेले. याविषयी त्यांनी विचारले असता त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यावर लिलाबाई यांचा मुलगा प्रतिक पाटील व प्रमोद पाटील यांनी किशोर निळे यास जाब विचारला असता त्याने व चेतन सुनील धनगर, हेमंत किशोर धनगर, सुनील आत्माराम धनगर, आत्माराम दोधू धनगर अशा पाच जणांनी लिलाबाईंसह त्यांच्या दोघा मुलांना शिवीगाळ करून मारहाण केली म्हणून पाच जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात वरील कारणावरून फिर्यादी चेतन सुनील निळे यास विरावली गावातील संशयित पिंटू गणेश पाटील, प्रमोद गणेश पाटील, विनोद हिरामण पाटील, विक्रम हिरामण पाटील, भैय्या भागवत पाटील या पाच जणांनी मारहाण केली. यामध्ये त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून या पाच जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार संजय देवरे, किशोर परदेशी हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

Maharashtra Politics : शरद पवारांचं वय झालंय, ते आता थकलेत, 'राष्ट्रवादी'ने कोणत्यातरी पक्षासोबत जावे; मंत्री चंद्रकांतदादांचा थेट सल्ला

Latest Marathi News Update : खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

SCROLL FOR NEXT