जळगाव

फैजपूरला बैलगाडी रस्त्यावर लावून रास्ता रोको आंदोलन

समीर तडवी

फैजपूर : शेतकरी विरोधी तीन काळे कायदा रद्द करावे या मागणी साठी फैजपूर येथे संविधान आर्मी चीप सेना, भारतीय संविधान बचाव सेना पिपल्स रिपब्लिकन पार्टी,श्री छत्रपती सेना तर्फे बैलगाडीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सकाळी अकरा वाजता सुभाष चौकात हे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन भारतीय संविधान बचाव सेना राष्ट्रीय सरचिटणीस पिपल्स रिपब्लिकन पार्टी, जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पिपल्स रिपब्लिकन पार्टी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख आरिफ शेख कलिम,श्री छत्रपती सेना जिल्हाध्यक्ष गोपी साळी शेख अमजद पहेलवान, बबलू तडवी,इमरान भाई,रुस्तुम तडवी,नाजीम भाई, मोहसीन तडवी हे या आंदोलनात सहभागी झाले होते.

राष्ट्रवादीने दिला पाठिंबा

आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष अन्वर खाटीक यांनी यावेळी पाठींबा दिला.आंदोलकांतर्फे फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे व फैजपूर तलाठी प्रशांत जावळे यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम जे शेख,हे कॉ रवींद्र मोरे,गोपनीय पोलिस अनिल महाजन,पो कॉ चेतन महाजन,नरेंद्र महाजन,बाळू मराठे,ज्ञानेश्वर पवार,योगेश महाजन, पोलीस गाडी चालक गुलबक्ष तडवी यांनी बंदोबस्त ठेवला होता.
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Stock Crash: गुगलच्या शेअरमध्ये २० वर्षांतील सर्वात मोठी घसरण! का वाढलीय टेक कंपन्यांची चिंता?

Uttar Pradesh: ''उत्तर प्रदेशात तिसऱ्यांदा सत्ता द्या, UCC लागू करु'' केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा

IND vs NZ 4th T20I: ग्लेन फिलिप्सचं वादळ पुन्हा घोंगावलं, भारताविरुद्ध शतकासह न्यूझीलंडला पार करून दिला २५० धावांचा टप्पा

Samruddhi Expressway: हेक्टरी एक लाखांची मदत द्या, अन्यथा रेल रोको! समृद्धी महामार्ग रोखून शेतकऱ्यांचे आंदोलन; आमदार नितीन देशमुख यांचा सरकारला इशारा

Marathi News Live Updates : उत्तराखंडमधील जोशीमठ येथे बद्रीनाथवरुन परतणारे हेलिकॉप्टर बेपत्ता

SCROLL FOR NEXT