Roads in Jalgaon will pit free Fund Rs 42 crore development works sakal
जळगाव

जळगावातील रस्ते होणार आता खड्डेमुक्त

महापालिकेच्या ४२ कोटींच्या कामांना शासनाची मान्यता

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव महापालिकेने शहरातील विविध विकास कामांसाठी ४२ कोटी रूपये निधीच्या ५९ कामांचा प्रस्ताव दिला होता. शासनाच्या नगरविकास विभागाने या कामांना मंजूरी दिली आहे. यात बहुतांश कामे ही मुख्य रस्त्यांची आहेत, त्यामुळे आता शहरातील रस्ते खड्डेमुक्त होतील असे सांगण्यात येत आहे.

जळगाव शहरातील रस्त्यामुळे नागरिक अत्यंत त्रस्त झाले होते. कोणत्याही भागात गेले तरी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत. या खड्डेमय रस्त्यातून मार्ग काढणे वाहनधारकांना कठीण झाले आहे. शहरातील रस्ते खड्डेमुक्त करावे या मागणीसाठी आंदोलनही करण्यात आले होते. मात्र, आता खड्ड्यांपासून जळगावकरांची सुटका होणार आहे.

४२ कोटीचा प्रस्ताव

जळगाव शहरातील रस्त्यातील खड्डे दुरूस्तीसह विविध विकासकामांचा ४२ कोटी रूपये निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, या निधीतील कामाबाबत आक्षेप घेण्यात आल्यामुळे शासनाने या निधीच्या कामाला ‘स्टे’दिला होता.

त्रीसदस्यीय समिती

शासनाकडून येणाऱ्या ४२ कोटीच्या निधीतून कोणती कामे घेण्यात यावी, यासाठी नगरविकास मंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांची त्रीसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने एकूण ५९ कामे सूचविली. त्यात सर्वाधिक कामे ही रस्त्यांची आहेत. चेन फेन्सींग, नालीवर ढापे टाकणे आदी कामे यातून रद्द करण्यात आली. त्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला.

शासनाकडून मंजुरी

शासनाच्या नगरविकास विभागाने या प्रस्तावावरील स्थगिती उठवून ४२ कोटींच्या निधीच्या कामांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे या निधीतील कामांचे टेंडर काढून लवकरच रस्त्याची कामे सुरू करण्यात येणार आहेत.

अतिशय महत्वाचा आणि बिकट प्रश्‍न सुटला आहे. यामुळे जळगाव शहरातील रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार. लवकरच या कामाच्या निवीदा काढून तातडीने कामे सुरू करण्यात येतील.

-जयश्री महाजन, महापौर, जळगाव

जळगाव शहरातील नागरिकांचे प्रश्‍न सुटावेत, शहरातील विकासकामे वेगाने व्हावीत, यासाठीच आमचा प्रयत्न आहे. ४२ कोटी रूपयांच्या निधी मंजूरीमुळे त्याला चालना मिळाली असून, जळगावात आता खड्डेमुक्त रस्ते होतील.

-कुलभूषण पाटील उपमहापौर, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT Qualifier 1 : चौकार गेला, हातातून बॅट सटकली अन् साई सुदर्शनचा 'गेम'झाला... IPL मधील सर्वात विचित्र विकेट Video

Gold Loan Fraud: बनावट सोन्याने १८ लाखांचा घोटाळा; एचडीएफसी बँकेच्या गोल्ड लोन व्हॅल्युअरसह १२ जणांवर गुन्हा

Sakal Vidya Education Expo : करिअरच्या वाटा; ३०, ३१ मे रोजी भेटा; काळेवाडीत ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’

अमरावतीच्या रामपुरी कॅम्पमध्ये शिरला बिबट; चार तासांनंतर वनविभागाने घेतले ताब्यात, नागरिकांची मोठी गर्दी

Music Composer Harsh Raut : लोकसंगीत कॉन्सर्टद्वारे उंचीवर नेण्याचा प्रयत्न; मोशीत शुक्रवारी ‘द फोक आख्यान’ कार्यक्रमाचे आयोजन

SCROLL FOR NEXT