Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अमळनेरला भर दिवसा घरातून दीड लाखांचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : शहरातील पाटील कॉलनी भागातील एका घरातून सोन्या चांदीच्या दागिण्यांसह रोख रक्कम मिळून सुमारे दीड लाखांची चोरी झाल्याची घटना मंगळवारी (ता. ७) दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान घडली. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. याबाबत पोलिसात अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, येथील पाटील कॉलनीतील प्रभूरंग रेसिडेन्सीमधील रहिवासी दीपक जगन्नाथ सूर्यवंशी हे मंगळवारी (ता. ७) दुपारी शालकाच्या लग्नानिमित्त कुटुंबीयांसह पैलाड परिसरात गेलेले होते. लग्नावरुन दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्या आई घरी परत आल्या असता, त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले.

अज्ञात चोरट्याने घरातील ३५ ग्रॅम वजनाची ८० हजार ५०० रुपयांची सोन्याची माळ, दहा ग्रॅम वजनाचा २३ हजार रुपयांचा सोन्याचा शिक्का, साडेसहा ग्रॅमची १४ हजार ९५० रुपयांचा सोन्याचा दागिना, २८ हजार रुपये रोख तसेच दुसऱ्या ठिकाणी ठेवलेले सहा हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ५२ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee Setback : उद्धव ठाकरेंपेक्षाही ममता बॅनर्जींना धक्का!, ८० पैकी ५९ आमदार साथ सोडणार; बंगालचे एकनाथ शिंदे कोण?

Mumbai News: पूरमुक्त मुंबईसाठी महापालिका सज्ज! पंपिंग स्टेशन, पर्जन्यवाहिन्यांवर लक्ष

Team India Coach: भारतीय संघात नव्या कोचची एन्ट्री! कोण आहेत गौतम गंभीरच्या टीममध्ये सामील झालेले नवीन सदस्य?

व्वा, काय व्यवस्था आहे! तरुणपणी परीक्षा दिली, पण सेवानिवृत्तीचे वय ओलांडल्यानंतर आलं नियुक्तीपत्र, लोकसेवा आयोगाचा गोंधळ

हायव्होलटेज ड्रामा! आधी उमेदवारी अर्ज बाद झाला, आता पित्रा-पुत्रावर गुन्हा दाखल; अमरावतीत शिंदेसेनेच्या दिग्गज नेत्यावर कारवाई

SCROLL FOR NEXT