

Gokul Dudh Election Date
esakal
Gokul Election Kolhapur : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’च्या पंचवार्षिक निवडणुकीचा संभाव्य कार्यक्रम निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, १५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर १८ ऑक्टोबर रोजी २५ जागांसाठी मतदान आणि १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होण्याची शक्यता आहे.