MPSC Exam
MPSC Exam esakal
जळगाव

MPSC Success Story : ‘एमपीएससी’ परीक्षेत पातोंड्याच्या तरुणांची बाजी!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : नुकताच जाहीर झालेल्या एमपीएससी परीक्षेच्या निकालात पातोंडा येथील रोहित पवार याची सहाय्यक अभियंता जलसंपदा विभाग तर प्रसाद चौधरी याची सहाय्यक आयुक्त राज्य कर पदी निवड जाहीर झाली आहे. (Rohit Pawar and Prasad Chaudhary from Patonda has clear MPSC Exam jalgaon news)

येथील रहिवासी व आरएससी विद्यालय मेहेरगाव (धुळे) येथे पर्यवेक्षकपदी कार्यरत असलेले विलास पवार व आई सविता पवार यांचा मुलगा रोहित पवार याने एमपीएससी परीक्षेत यश मिळवून सहाय्यक अभियंता जलसंपदा विभाग या पदावर बाजी मारली.

तर जळगाव येथे सहाय्यक फौजदारपदी कार्यरत असलेले नंदलाल चौधरी व आई रंजना चौधरी यांचा मुलगा व आप्पा चौधरी यांचा पुतण्या प्रसाद चौधरी याने एमपीएससी परीक्षेत यश मिळवून सहाय्यक आयुक्त राज्य कर पदी बाजी मारली. योगायोग म्हणजे विलास पवार व नंदलाल चौधरी हे वर्गमित्र आहेत. दोन्ही परिवारांनी मुलांना पेढे भरवत आनंद साजरा केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गावातील तरुणांनी एमपीएससी परीक्षेत सरशी केल्याने पवार व चौधरी परिवारासह ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, दोन्ही परिवारांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सरपंच भरत बिरारी, ग्रामपंचायत सदस्य दिलीप बोरसे, संदीप पवार, विनायक बिरारी, विकासो चेअरमन सुनील पवार, उपसंचालक कपिल पवार, अमोल चौधरी, घनश्याम पाटील, राकेश पाटील, विलास चव्हाण, राजन बिरारी, माहिजी देवी मंडळ, दक्षिणमुखी हनुमान मंडळ, छत्रपती प्रतिष्ठान व तरुणांकडून दूरध्वनीवरून दोन्ही परीवारांना व निवड झालेल्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: स्टार्कने दिल्लीला दिला दुसरा मोठा धक्का! धोकादायक फ्रेझर-मॅकगर्कला धाडलं माघारी

SCROLL FOR NEXT