Death  esakal
जळगाव

Jalgaon : रोटाव्हेटरमध्ये जखमी शेतमजुराचा मृत्यू

रईस शेख

जळगाव : आव्हाणे शिवारातील रोटाव्हेटर (Rotavator) ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात शेतमजूर गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू ओढवल्याने ट्रॅक्टर चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. बाळू दयाराम देवरे (वय ३२, रा. आव्हाणे, ता. जळगाव) असे मयताचे नाव आहे. (rotavator Injured farm laborer dies Jalgaon News)

भडगाव तालुक्यातील मूळ रहिवासी बाळू देवरे हा आव्हाणे (ता. जळगाव) येथे कामासाठी रहायला आला होता. पत्नी एक मुलगा असा त्यांचा परिवार असून गावातील शेतकरी विजय पाटील यांच्या शेतात ते कामाला होते. याच शेतात बाळू देवरे यांचे सासरे गौतम साबळे हेदेखील मजुरीने काम करतात. शनिवारी (ता. २५) सकाळी विजय पाटील यांच्या शेतात ट्रॅक्टरव्दारे रोटाव्हेटरचे काम सुरु होते. बाळू देवरे हे या रोटाव्हेटरवर देखरेखीचे काम करत होते. यादरम्यान ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटले, भरधाव ट्रॅक्टरने बाळू देवरे यांना जोरदार धडक दिली. या अपघातात बाळू देवरे यांचा पाय कापला गेला होता त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना बाळू देवरे यांचा मृत्यू ओढवला. मयत बाळू देवरे यांच्या पश्चात पत्नी मनीषा व चेतन वय ९ वर्ष असा परिवार आहे.

चालकावर गुन्हा दाखल

या अपघातास कारणीभूत ट्रॅक्टरवरील चालक आधार बाबूलाल लोंढवे (ता. अमळनेर) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विश्वनाथ गायकवाड करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT